vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

चिपळूणमध्ये नदी गाळ उपसा मोहिमेला वेग; वाशिष्ठीतून १० लाख क्युबिक मीटर गाळ काढणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

चिपळूणमध्ये नदी गाळ उपसा मोहिमेला वेग; वाशिष्ठीतून १० लाख क्युबिक मीटर गाळ काढणार – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

रत्नागिरी, प्रतिनिधी चिपळूणसह संपूर्ण जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामाला आता मोठी गती मिळणार आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली चिपळूण येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत वाशिष्ठी नदीतून यावर्षी तब्बल १० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पालकमंत्र्यांनी या निर्णयांची सविस्तर माहिती दिली

नाम फाउंडेशनकडे जबाबदारी: राज्य शासनाने ‘नाम फाउंडेशन’सोबत ३१ रुपये प्रती क्युबिक मीटर दराने सामंजस्य करार (MoU) केला आहे. त्यानुसार, वाशिष्ठी नदीतील १० लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याची संपूर्ण वर्कऑर्डर शासनाच्या नियमांनुसार नाम फाउंडेशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

छोट्या नद्यांसाठी ५ कोटींचा निधी: जिल्ह्यातील ज्या छोट्या आणि नोंद नसलेल्या नद्या आहेत, त्यांच्या गाळ उपशासाठी जिल्हा नियोजन मंडळातून (DPDC) ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यातील व मतदारसंघातील प्रत्येकी दोन नद्यांची निवड करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. या नद्यांतील गाळही ३१ रुपये प्रती क्युबिक मीटर दरानेच काढला जाईल.

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचा समावेश: वाशिष्ठीसोबतच जगबुडी, शास्त्री आणि अर्जुना यांसारख्या जिल्ह्यातील सहा मोठ्या नद्यांमधील साचलेला गाळ काढण्यासाठीही एक विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.

या सकारात्मक निर्णयांमुळे जिल्ह्यातील नद्यांचे पुनरुज्जीवन होऊन पूरनियंत्रणास मोठी मदत होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

००००

संबंधित पोस्ट

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बालगृहांची सुविधा उपलब्ध करा – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे· मुलींचे शिक्षण, बालविवाह रोखण्यासाठी सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कारागृहातील बंद्यांच्या मनपरिवर्तनासाठी मुलाखत कक्ष उपयुक्त- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- बंदी नातेवाईक भेटीसाठी मुलाखत कक्षाचे उद्घाटन – कौशल्य प्रशिक्षित बंद्यांना प्रमाणपत्र वितरण

गोकुळ’चे ‘हलाल प्रमाणपत्र’ तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक*

vishwatmaklokswamivarta

आ.खोतकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे विद्युत पुरवठा सुरळीत होण्याचे मार्गावर**डीपीआर साठी प्रशासन झाले सज्ज*

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने लातूर येथे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत मार्गदर्शन