vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ठाणे-कसारा, खोपोली मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढवा पूर्ण झालेल्या फलाट विस्ताराचा प्रवाशांना तातडीने लाभ द्या-खासदार नरेश म्हस्के यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

ठाणे-कसारा, खोपोली मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढवा पूर्ण झालेल्या फलाट विस्ताराचा प्रवाशांना तातडीने लाभ द्या-खासदार नरेश म्हस्के यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणीठाणे-कसारा, खोपोली मार्गावर १५ डब्यांच्या लोकल वाढवा पूर्ण झालेल्या फलाट विस्ताराचा प्रवाशांना तातडीने लाभ द्या-खासदार नरेश म्हस्के यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी

ठाणे प्रतिनिधी – मध्य रेल्वेच्या ठाणे-कसारा- खोपोली मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये तातडीने वाढ करावी, तसेच रखडलेली फलाट विस्ताराची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्र पाठवले आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी ठाणे ते कसारा आणि खोपोलीदरम्यानच्या ३३ स्थानकांवर फलाट विस्ताराचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून कल्याण-कर्जत-खोपोली विभागातील काही स्थानकांवरील कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या संथ कारभारामुळे या सुविधांचा प्रत्यक्ष लाभ प्रवाशांना मिळत नसल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रात नमूद केले आहे.

१५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढ नाही

रेल्वे प्रशासनाने २० जुलै आणि १५ ऑगस्ट रोजी सीएसएमटी ते कर्जत आणि खोपोली मार्गावर प्रत्येकी एका १२ डबा लोकलचे १५ डब्यामध्ये रूपांतरित करून सीएसएमटी ते कर्जत आणि खोपोली मार्गावर काही लोकल फेऱ्या सुरु केल्या. मात्र, त्यानंतर १०० दिवस उलटूनही एकाही नवीन १५ डब्यांच्या लोकल फेरीची भर पडलेली नाही. कोणतीही तांत्रिक अडचण नसताना फलाट तयार असूनही लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होत नसल्याची बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनच्या निदर्शनास आणून दिली आहे.

 फलाट विस्ताराची कामे अद्याप अपूर्ण,गेल्या वर्षी दिवाळीनंतर सुरू झालेल्या फलाट विस्ताराच्या कामाला वर्ष उलटून गेले, तरी ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील तसेच कसारा विभागातील अनेक स्थानकांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.

विस्तारित फलाटांवर सुरक्षिततेचा प्रश्न,विस्तारित फलाटांचा काही भाग सध्या वापराविना रिकामा पडून आहे. या ठिकाणी भिकारी, बेघर आणि गर्दुल्ले बसत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी चिंता व्यक्त आहे.

कल्याण-कर्जत-खोपोली मार्गावरील गर्दीच्या १२ डब्यांच्या लोकलचे तातडीने १५ डब्यांच्या लोकलमध्ये रूपांतर करून फेऱ्या वाढवाव्यात; ठाणे-कल्याण धीम्या मार्गावरील आणि कसारा विभागातील अपूर्ण फलाट विस्ताराची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत; विस्तारित फलाटांवर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांची गस्त वाढवावी ; फलाटांवरील गर्दुल्ले व बेघरांचा वावर रोखून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करावी या सर्व मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा, अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी पत्राद्वारे केली आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम वाळू प्रकल्पांना सवलती देऊन प्रोत्साहन*जिल्ह्यात कृत्रिम वाळू निर्मितीला चालना*जिल्हाधिकाऱ्यांचे उद्योजकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीत नाव कायम राहण्यासाठी एसआयआर कार्यक्रमांतर्गत मॅपींग करून घेणे अनिवार्य**मतदार याद्या सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य करण्याचे नागरिकांना आवाहन*

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन 

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

टी. सी. महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ