vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दुबार नोंदीतील मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची पुन्हा संधी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

दुबार नोंदीतील मतदारांना गणना प्रपत्र सादर करण्याची पुन्हा संधी- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

 

        सांगली, : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR-2026) अनुपस्थित, स्थलांतरीत, मृत किंवा दुबार म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारुप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना भारत निवडणूक आयोगाने नोंदणीची पुन्हा एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. एकही पात्र मतदार मतदार यादीपासून वंचित राहू नये आणि एकही अपात्र मतदार यादीत राहू नये या उद्देशाने सर्व संबंधित मतदारांनी उपलब्ध संधीचा लाभ घेवून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी केले आहे.

            मतदार त्यांचा जुना EPIC क्रमांक वापरून निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ किंवा ‘ECINET’ अॅपद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. जुन्याच पत्त्यावर राहणाऱ्यांनी ‘परिशिष्ट ब’, तर राज्यांतर्गत स्थलांतरित झालेल्यांनी नवीन पत्त्याच्या पुराव्यासह ‘परिशिष्ट क’ मधील निवेदन जोडणे आवश्यक आहे. बीएलओ स्वतः संपर्क साधून प्रपत्र उपलब्ध करून देतील. तसेच संबंधित मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासावे. नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी किंवा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक गणना प्रपत्र व निवेदन विहित मुदतीत सादर करावे, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन “देशाच्या पुनर्बांधणीच्या दृष्टीने एक व्यापक राष्ट्रीय मिशन” असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन

देशभरात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सक्रिय देखरेख…

विधानपरिषद प्रश्नोत्तरे शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर;अहवालांतील विलंबही कमी होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्ह्यात एल.पी.जी. गॅसचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन तक्रारीसाठी तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर

राज्य विधानसभा निवडणुका | दुपारी 1 वाजेपर्यंत अंदाजे मतदान टक्केवारी 📊 तामिळनाडू – 56.81% पश्चिम बंगाल (पहिला टप्पा) – 62.18% टक्के मतदान…

न्यायाच्या दारात उपोषण, प्रशासनाच्या दारात कुलूप!सहा दिवसांचा जीवघेणा लढा; जयश्री कटके अढळ…अधिकाऱ्यांची बेफिकिरी उघडी…