vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दुष्काळी उपाययोजनांबाबत प्रशासन तत्परपाणीटंचाई निवारणार्थ सेलू तालुक्यातील 8 गावात विहिरी व बोअरवेल अधिग्रहित• पिण्याच्या पाण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य ..

दुष्काळी उपाययोजनांबाबत प्रशासन तत्परपाणीटंचाई निवारणार्थ सेलू तालुक्यातील 8 गावात विहिरी व बोअरवेल अधिग्रहित• पिण्याच्या पाण्याला जिल्हा प्रशासनाने प्राधान्य ..

परभणी, प्रतिनिधी: ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसह जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सेलू तालुक्यातील आठ गावांमधील विहिरी व बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. दुष्काळी भागात तत्परतेने पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने पाऊल उचलले असून, संबंधित गावांतील पाणीपुरवठा व्यवस्थेला आधार मिळणार असल्याचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी सांगितले आहे.

सेलू तालुक्यातील राव्हा, आहेर बोरगाव, तिडी पिंपळगाव, रायपूर, पार्टी कौसडी, कुंडी, तळतुंबा आणि डासाळा या आठ गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने विहीर व बोअरवेल अधिग्रहणाची कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये राव्हा आणि रायपूर येथे विहिरी, तर उर्वरित गावांमध्ये बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

अधिग्रहित करण्यात आलेल्या विहिरी व बोअरवेलमध्ये राव्हा येथील रामेश्वर कुंडलीकराव देवकते यांची विहीर, आहेर बोरगाव येथील शेख उमर शेख कठाळू यांची बोअरवेल, तिडी पिंपळगाव येथील दत्ता सोपानराव जोगदंड यांची बोअरवेल, रायपूर येथील अमोल बाबासाहेब गाडेकर यांची विहीर, पार्टी कौसडी येथील गणेश नरसिंग आढे यांची बोअरवेल, कुंडी येथील भागवत आन्सिराम मोगल यांची बोअरवेल, तळतुंबा येथील भगवान बाबुराव घुले यांची बोअरवेल आणि डासाळा येथील शेख इद्रीस शेख बडेमिया यांची बोअरवेल अधिग्रहित करण्यात आली आहे. या अधिग्रहणाच्या माध्यमातून संबंधित गावांतील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होणार असून, नागरिकांना तसेच जनावरांना गरजेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

*-*-*-*-*

संबंधित पोस्ट

भंडारा जिल्ह्यात महाप्रसादातून १५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्यानं रुग्णालयात उपचार सुरू..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी यांच्या 300 कोटी रुपये अतिरिक्त मागणीला मुख्यमंत्री यांचा सकारात्मक प्रतिसाद· राज्य नियोजन समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या**पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन*

उमरखेड मतदारसंघातील हायब्रिड ॲन्युईटी टप्पा-२ मधील रस्ते कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

पावसाच्या ओढीने बीड जिल्हा होरपळला; केंद्रीय पथकासमोर दुष्काळाचे भीषण वास्तव ५४ हजारांच्या खर्चातून हाती केवळ १० हजार; शेतीचे अर्थकारण कोलमडले

vishwatmaklokswamivarta