vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात,अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या!- हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात,अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या!- हिंदु जनजागृती समितीचे आवाहन

राज्य प्रतिनिधी-

     नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे ‍विशेष आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अनेक शहरांमध्ये हिंदु युवती आणि महिलांसाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित करण्यात येत असून महिला-सुरक्षेविषयी जनजागृती करणारे विविध व्हिडिओ, तसेच प्रेरणादायी शौर्य गीत प्रसारित करण्यात येणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी दिली आहे.

 

     याबाबत अधिक माहिती देतांना श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की, आज युवतींना छेडछाड, पाठलाग, ऑनलाईन त्रास, लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, तसेच हिंसक हल्ले यांसारख्या विविध धोक्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही परधर्मीय लोक खोटे नाव आणि खोटी ओळख सांगून हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून त्यांचे शारिरीक शोषण करतात. पुढे या लव्ह जिहादच्या घटनांमध्ये ब्लॅकमेलिंग किंवा धर्मांतरासाठी दबाव आणला जातो. याबाबत युवतींमध्ये जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर भीती नव्हे, तर जागरूकता, आत्मविश्वास आणि स्वरक्षणाचे कौशल्य निर्माण करण्यासाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान राबवण्यात येणार आहे.

 

     या स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांमध्ये शारीरिक प्रतिकाराचे तंत्र शिकवण्याबरोबरच संकटाची चाहूल ओळखणे, योग्य वेळी निर्णय घेणे, तसेच मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खंबीर रहाण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण वर्गांमध्ये १५ ‌वर्षांवरील युवतींसाठी प्रवेश दिला जाणार आहे. हिंदु जनजागृती समितीने अधिकाधिक हिंदु युवतींनी या अभियानात सहभागी होऊन ‍विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले आहे. स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी आपल्या शहरातील ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानात सहभागी होण्यासाठी सोबत दिलेला क्यू-आर कोड (QR Code) स्कॅन करून अथवा खालील लिंक वर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पहा – www.hindujagruti.org/hindi/navratri-festivalश्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : ९९८७९ ६६६६६) QR Code : ‘मैं हूँ दुर्गा’ वर्गात सहभागी होण्यासाठी वरील क्यू-आर कोड (QR Code) स्कॅन करा !

00000

संबंधित पोस्ट

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील १८ हजार १२४ मतांनी विजयीडॉ. प्रतापसिंह पाटील यांना ८५ हजार ८७६, तर सतीश चव्हाण यांना ६७ हजार ७५२ मते३९ उमेदवारांच्या वगळणीनंतर अंतिम निकाल जाहीर ; विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नाहीनिवडणूक निर्णय अधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते पहाटे ५ वाजून १० मिनिटांनी विजयाचे प्रमाणपत्र प्रदानसलग ४५ तासांहून अधिक काळ मतमोजणी ; अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रक्रिया पूर्ण

vishwatmaklokswamivarta

नसरापूर प्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार – राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय कडे द्यावा-मुंबई उच्च न्यायालय

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राला मिळणार सुमारे १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरण

हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार- हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार