vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.

नाशिक कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामांना सविस्तर प्रकल्प अहवालअभावी प्रशासकीय मंजुरी दिल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य पंकज भुजबळ यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण ३४ हजार ७३२.३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करणे तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याने या कामांसाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नसल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी नमूद केले.

रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन असून त्यापैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याने विकासकामे एकाचवेळी सुरू आहेत. मात्र, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, सदस्य सत्यजित तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री श्री. सामंत यांनी नमूद केले.

00000

संबंधित पोस्ट

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

चौथे विश्व मराठी संमेलन मराठीचा शुद्ध, सक्षम आणि प्रभावी वापरासाठी माध्यमांचा नेहमीच पुढाकार -मराठी परिसंवादातील सूर

पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील हिवरा नाईक गावासाठी टँकर मंजूर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार,- शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा- ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे लोकार्पण