vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

व्यावसायिक प्रतिनिधी-

     अमरावती,  अचलपूर तालुक्यातील परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण बॅचचा निरोप समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. 1 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात आलेल्या या एक महिन्याच्या विशेष प्रशिक्षणाचा समारोप प्रमाणपत्र वितरण सोहळ्याने करण्यात आला. या उपक्रमाचा एकूण 32 महिला लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

     या कार्यक्रमाला विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, उपव्यवस्थापक ऋषिकेश कथलकर, एमसीडी प्रकल्प अधिकारी राजेश सुने, आयोजक गणेश बहाड आणि प्रशिक्षिका जोत्स्ना राऊत उपस्थित होते. यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व 32 महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली

   विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी महिलांना मार्गदर्शन करताना स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले. तसेच, व्यवसाय उभारणीसाठी ‘अमृत’ आणि ‘एमसीडी’ मार्फत सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले

प्रकल्प अधिकारी राजेश सुने यांनी लाभार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची माहिती देऊन या योजनेच्या माध्यमातून अर्थसाहाय्य मिळवून आपला व्यवसाय यशस्वी कसा करावा, याचे तंत्र समजावून सांगितले.

    कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले. प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.काही महिलांनी स्वतःचा व्यवसायदेखील सुरू केला आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

चला शाळेत जाऊ या’ अभियानातून शाळांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य; गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन कटिबद्ध शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्याकडून ठाणे जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा आढावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगांसाठी पुनर्वसन सेवा सुरू AIIPMR मुंबईच्या सहकार्याने दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन व उपचार

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील अभोडा झरी गावासाठी टँकर मंजूर

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*

बुलढाण्यातील खुल्या प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी;४२ आधुनिक कौशल्य विकास अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण; निवास व भोजनाचीही मोफत सुविधा

vishwatmaklokswamivarta