vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर थरारक हल्ला! सहा जणांकडून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला; दोन पिस्तुले आणि मॅगझिन जप्त, तरुणाची प्रकृती गंभीर!

पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर थरारक हल्ला! सहा जणांकडून तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला; दोन पिस्तुले आणि मॅगझिन जप्त, तरुणाची प्रकृती गंभीर!पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत

गुन्हे वार्ताहार-पुणे : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाबाहेर बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) दुपारी एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे असे जखमी तरुणाचे  नाव आहे. बुधवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ ही घटना घडली. हल्लेखोर दोन दुचाकींवरून आले होते. त्यांनी मंदार यांचा पाठलाग करून त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. मात्र, पोलिसांना घटनास्थळावरून दोन पिस्तुले आणि एक मॅगझिन मिळाले आहे. गोळीबार झाला होता की नाही, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता झालेली नाही.पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय,मंदार किवळे हे शुभम चव्हाण यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर,न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी भरदिवसा अशा प्रकारची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. न्यायालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.पुढील तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित पोस्ट

नियमबाह्य तेजस्वी एलईडी बल्बप्रकरणी1044 वाहनधारकांना साडेचार लाख रुपये दंडाची आकारणी वायुवेग पथकाची वर्षभरातील कारवाई

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta

29 वर्षीय तरुणी राबोडी येथून बेपत्ता शोध घेण्याचे राबोडी पोलिसांचे आवाहन

अँटी नार्कोटिक्स सेलच्या- पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त

हातभट्टी निर्मिती विरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाची धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी.