vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

राज्यस्तरीय शालेय सेपाकटाकरा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींची चमकदार कामगीरी; संघाला तृतीय स्थान श्रुती मांटे ची राष्ट्रीय संघात निवड

राज्यस्तरीय शालेय सेपाकटाकरा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींची चमकदार कामगीरी; संघाला तृतीय स्थान श्रुती मांटे ची राष्ट्रीय संघात निवड

जालना/प्रतिनीधी – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच न्यु सेपक टाकरा असोिएशन वर्धा यांच्या तांत्रीक सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुल वर्धा या ठिकाणी दि. 25 ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा क्रीडा स्पर्धा 2026-27 मध्ये छ. संभाजीनगर विभागाचे प्रतिनीधीत्व करत जालनाच्या ऋषी विद्या एज्युकेशनल स्कुलच्या 17 वर्षाआतील मुलींच्या संघाने चमकदार कामगीरी करत तृतीय स्थान प्राप्त केले. सदर संघात कर्णधार श्रुती मांटे, गौरी धोत्रे, वेदा मोरे, वेदीका क्षीरसागर, तरणप्रीत मेहरा यांचा समावेश आहे. संघ व्यवस्थापक म्हणुन श्रीमती अर्चना धोत्रे तसेच संघातील श्रुती मांटे हिने आपल्या सातत्यपुर्ण कामगीरीच्या जोरावर राज्याच्या संघात आपले स्थान निश्चित केले व तीची राष्ट्रीय शालेय स्पर्धेकरीता करण्यात आली.

संघाला जिल्हा संघटनेच सचिव शेख चाँद पी.जे. यांचे मार्गदर्शन तर अमोल काटकर यांचे प्रशिक्षण लाभले. संघाच्या या ऐतीहासीक विजयाबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसवेक अश्विन अंबेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, ऋषी विद्या स्कुलच्या एमडी श्रीमती शितल भाला, प्रिसींपल डॉ. हेमा सोनटक्के, व्हाईस प्रिंसीपल यशवंत ढोलके, प्रायमरी हेड मिस्ट्रेस श्रीमती प्रतीमा गोरंट्याल, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. तुलजेश भुरेवाल, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच जालना जिल्हा सेपाक टाकरा संघटना, जिल्हा ऑलंम्पीक असोसिएशन जालना व कला क्रीडा दूत फ ॉऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

——0000

संबंधित पोस्ट

बुलढाण्यात राज्यस्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न 🌟

vishwatmaklokswamivarta

जपान आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या गुणवंत खेळाडूंची भव्य गौरव रॅली

vishwatmaklokswamivarta