vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रितम देवसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रितम देवसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, प्रतिनिधी : ललित कला अकादमीच्या ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे. रमेश विठ्ठल थोरात, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे आणि प्रितम मधुकर देवसकर यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित ललित कला अकादमी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात ६५ व्या राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि तिसऱ्या ‘प्रिंट बिनाले इंडिया’च्या संयुक्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय संस्कृती व पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संस्कृती मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल यावेळी उपस्थित होते.

या सोहळ्यात रमेश विठ्ठल थोरात यांना ‘अनटायटल्ड – II’ या तैलचित्रासाठी, सिद्धार्थ शाहजीराव शिंगाडे यांना ‘ट्रीज’ या मिश्र माध्यमातील कलाकृतीसाठी, तर प्रितम मधुकर देवसकर यांना ‘ऑफ टाइम अँड द सिटी’ या प्रिंटमेकिंगमधील कलाकृतीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी देशातील २७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील २,४९५ कलाकारांच्या एकूण ६,१७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यातून पहिल्या टप्प्यात निवड समितीने २७० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड केली. त्यानंतर अंतिम निवड प्रक्रियेतून २० उत्कृष्ट कलाकृती राष्ट्रीय पुरस्कारांसाठी निवडण्यात आल्या होत्या. विविध कलामाध्यमांतील त्यांच्या उत्कृष्ट कलाकृतींची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने महाराष्ट्राच्या कलाप्रतिभेचा गौरव झाला आहे.

 

संबंधित पोस्ट

स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 मतदार बजावणार मतदानाचा हक्कØ वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक

शासकीय आदर्श आश्रमशाळांमध्ये इयत्ता पाचवी प्रवेशासाठी १२ एप्रिल रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

आत्ताची मोठी बातमी -ठाणे जिल्ह्यातील कल्याण-मुरबाड मार्गावर रायते पुलावर भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी….

vishwatmaklokswamivarta

५१७ जणांच्या सामूहिक शंखनादाने नाशिकच्या नावे इतिहास; अमेरिकेचा ३०३ शंखवादकांचा विक्रम मोडला शंखनादाच्यापालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या मंगल पर्वाची आध्यात्मिक नांदी विश्वविक्रमाने दुमदुमला गोदाकाठ!

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५,०२८ कोटींची रक्कम जमा

दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील• पालकमंत्री व सहपालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा आढावा• चारा, पाणी, वीज आणि जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta