vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याला जीवदान; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक

विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याला जीवदान; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून वनविभागाच्या कामगिरीचे कौतुक

रत्नागिरी, प्रतिनिधी: वनविभागाने अत्यंत धाडसाने विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याच्या (ब्लॅक पॅंथर) पिल्लाला सुखरूप रेस्क्यू करून जीवदान दिले आहे. या यशस्वी मोहिमेनंतर राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळून येथील वन विभागाच्या कार्यालयाला भेट देत वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उप विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, सहायक वन अधिकारी प्रियांका लगड आदी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी वनविभागाच्या कार्यतत्परतेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “ब्लॅक पॅंथर हा अत्यंत दुर्मीळ असून त्याचे अस्तित्व फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. मात्र, गेल्या तीन-चार महिन्यांत जिल्ह्यात अशा प्रकारे ब्लॅक पॅंथर आढळण्याची आणि वनविभागाने त्यांना सुखरूप वाचवण्याची ही दुसरी घटना आहे. या कामगिरीवरून वनविभागाची रेस्क्यू टीम संपूर्ण महाराष्ट्रात ‘नंबर वन’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

”जिल्ह्यातील महिला वनाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना डॉ. सामंत पुढे म्हणाले, “आमच्या जिल्ह्याच्या दोन्ही प्रमुख वनाधिकारी या महिला आहेत. महिला असूनही अत्यंत सक्षमपणाने आणि धाडसाने त्या अशा आक्रमक वन्यप्राण्यांना हाताळतात आणि रेस्क्यू करतात, ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांचे शंभर टक्के कौतुक केलेच पाहिजे.

हा प्राणी स्वभावतः आक्रमक असूनही या संपूर्ण मोहिमेदरम्यान त्याने कोणत्याही नागरिकाला किंवा कर्मचाऱ्याला इजा पोहोचवली नाही आणि वनविभागानेही त्याला कोणतीही हानी न पोहोचवता अत्यंत कुशलतेने सुरक्षित बाहेर काढले, याबद्दल पालकमंत्र्यांनी संपूर्ण टीमचे आभार मानले. या घटनेमुळे परिसरात या दुर्मीळ काळ्या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठे कुतूहल पाहायला मिळाले.

०००

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

देवणी येथे 2 एप्रिल रोजी महादेव यात्रेनिमित्तपशु व पक्षी प्रदर्शनाचे आयोजन

ग्रंथभेट योजनेसाठी सन 2025 कॅलेंडर वर्षातील प्रकाशित ग्रंथ 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत- प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त साताऱ्यात ‘महिला सन्मान बाईक रॅली’; हजारो महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

ब्रेकवॉटर भिंत व प्रवासी जेटी प्रकल्पामुळे पर्यटन व मत्स्यव्यवसायाला चालना     – मत्स्यव्यवसाय,बंदरे मंत्री नितेश राणे*

प्री-मॅट्रीक व पोस्ट मॅस्ट्रिक शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठीपात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta