vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी-जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर**संविधान दिनानिमित्त खांदेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान*

*ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी-जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर**संविधान दिनानिमित्त खांदेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान*

रायगड-अलिबाग प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी किल्ल्यांचे महत्त्व ओळखून त्यांची निर्मिती केली. या ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे अभियान संविधान दिनापुरते मर्यादित न राहता वर्षभर गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची चळवळ समाजामध्ये रुजली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी केले.संविधान दिनानिमित्त आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या उपक्रमांतर्गत खांदेरी किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय भोसले, उपप्रादेशिक अधिकारी ऋतुजा भालेराव (रायगड-२), संदीप बागुल आणि दुर्गरक्षक संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय भोसले यांनी खांदेरी किल्ल्याचे पर्यावरणीय महत्त्व विशद करत आपण ज्या प्रकारे आपल्या घराची काळजी घेतो, त्याच भावनेने गड-किल्ल्यांची जपणूक आणि स्वच्छता राखली पाहिजे, असे ते म्हणाले. या अभियानात दुर्गरक्षक संस्थेच्या स्वयंसेवकांनी सुमारे ५० किलो प्लास्टिक कचरा आणि २० किलो काचेच्या बाटल्यांचा कचरा संकलित केला. .  यावेळी संविधानातील उद्देशिकेचे शपथपूर्वक सामूहिक वाचन करण्यात आले.  उपप्रादेशिक अधिकारी ऋतुजा भालेराव यांनी उपस्थित मान्यवर, स्वयंसेवक व सहभागी सर्वांचे आभार मानले.

०००

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण, समाज कल्याण व विषय समित्यांच्या* *सभापदी पदांची निवड संपन्न*

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..

सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेसला १८ एप्रिल रोजी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta