vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कौंडण्यपूर विकास आराखडा प्रत्यक्षात आणणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेअंबा-रुख्मिणी महोत्सवात उपस्थिती महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे रुख्मिणी मातेकडे साकडं जलसंवर्धनात सहभाग देण्याचे नागरिकांना आवाहन

कौंडण्यपूर विकास आराखडा प्रत्यक्षात आणणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेअंबा-रुख्मिणी महोत्सवात उपस्थिती महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे रुख्मिणी मातेकडे साकडं जलसंवर्धनात सहभाग देण्याचे नागरिकांना आवाहन

 

अमरावती, प्रतिनिधी: माता रुख्मिणीचे माहेरघर असलेल्या श्री. क्षेत्र कौंडण्यपूरला मोलाचा ऐतिहासिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपण्यासाठी कौंडण्यपूर विकास आराखडयातील सर्व कामे प्रत्यक्षात आणली जातील असे सांगत महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्राला दुष्काळातून मुक्त करण्याचे साकडे घातले. अंबा-रुख्मिणी महोत्सवात सहभागी सर्व भक्तांनी आपापल्या गावात जलसंवर्धनाच्या कामात सहभाग घ्यावा व काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    कौंडण्यपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानात आयोजित अंबा-रुक्मिणी महोत्सवात पालकमंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. आमदार प्रवीण तायडे, माजी खासदार नवनीत राणा, कौंडण्यपूर येथील विठ्ठल- रुख्मिणी मंदिराचे अध्यक्ष नामदेवराव अंबाडकर आणि संत-महंत यावेळी उपस्थित होते      पालकमंत्री श्री बावनकुळे म्हणाले, श्री. क्षेत्र कौंडण्यपूर हे अमरावती व विदर्भाच्या इतिहासाचे व संस्कृतीचे लेणे आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी श्री क्षेत्र कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.या विकास आराखड्यातील कामांना गती देऊन ही कामे पूर्ण करण्यात येतील.यासाठी नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात आराखडया विषयीच्या कामांबाबत बैठक घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.     मंदिर संस्थान समोरील वर्धा नदीला अर्पण करण्यात आलेली २२१ मिटर लांबीची साडी म्हणजे कौंडण्यपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी वरदायीनी नदीप्रती कृतज्ञ भाव असल्याचे सांगून या नदीचे पावित्र्य टिकवून ठेवण्याचे तसेच नदी प्रदूषित होणार नाही याची काळजी घेण्याचे व या जलस्त्रोताचे संवर्धन व्हावे, अशा अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती असून ३१० तालुके दुष्काळ सदृश्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. अंबा रुख्मिणी महोत्सवात सहभागी सर्व भाविकांनी व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा तसेच आपापल्या गावात व परिसरात सुरू असलेल्या जलसंवर्धनाच्या कामात सहभाग घेण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.      तत्पूर्वी, पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी विठ्ठल रुख्मिणीची विधिवत पुजा करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते येथील वर्धा नदीचे पूजन करण्यात आले व नदीच्या विस्तीर्ण पात्रात २२१ मिटरची वैशिष्ठ्यपूर्ण साडी अर्पण करण्यात आली. लोकप्रतिनिधी, संत-महंत, भाविक व नागरिक यावेळी उपस्थित होते.

०००००००

संबंधित पोस्ट

लोकशाहीत आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्यासाठी, विना परवानगी आंदोलन किंवा हिंसा करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पुढील दोन दिवस रेड अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

सामाजिक उत्तरदायित्वाचा निधी प्रदूषण नियंत्रणासाठी वापरावे – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे जालन्यातील उद्योगांनी प्रदुषण नियंत्रण यंत्रणांमध्ये कालबद्धपद्धतीने सुधारणा करावी

राज्यभरातील शिशु पोषणासाठीच्या अन्नाचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री, नाममुद्रांकन आणि प्रचार यांचे विनियमन करणारा सर्वसमावेशक अनुपालन आदेश जारी करण्यात आला असल्याचे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार