vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हिल व महिला रुग्णालयाच्या ओपीडी वेळेत बदल करा-भास्कर आबा दानवे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी..

ग्रामीण रुग्णांच्या सोयीसाठी सिव्हिल व महिला रुग्णालयाच्या ओपीडी वेळेत बदल करा-भास्कर आबा दानवे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी..

जालना प्रतिनिधी : जालना येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) तसेच शासकीय महिला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागाच्या (ओपीडी) वेळेत बदल करून ती सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर हे जालना दौऱ्यावर आले असता यांच्याकडे (दि.२७) निवेदनाद्वारे केली आहे.

जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये येत असतात. मात्र, सध्या या दोन्ही रुग्णालयांच्या ओपीडीची वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० आणि सायंकाळी ४ ते ६ अशी आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना लांबचा प्रवास करून रुग्णालयात पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. अनेकदा रुग्णालयात पोहोचेपर्यंत दुपारचे १२ ते १२.३० वाजतात. त्यामुळे ओपीडीची वेळ संपत आल्याने अनेक रुग्णांना वेळेत तपासणी व उपचार मिळण्यात अडचणी येतात. तसेच दुपारी ओपीडी बंद झाल्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत रुग्णांना रुग्णालयातच थांबावे लागते. विशेषतः महिला, वृद्ध, लहान मुले तसेच लांबच्या गावांमधून आलेल्या रुग्णांना या वेळापत्रकामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. या गोष्टींचा विचार करता ओपीडीच्या वेळेत बदल करणे आवश्यक असल्याचे भास्कर आबा दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी सलग ओपीडी सुरू ठेवल्यास ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सोयीच्या वेळेत उपचार घेता येतील. तसेच दुपारच्या वेळेत ओपीडी बंद राहण्यामुळे होणारी गैरसोयही दूर होईल. यामुळे रुग्णांना विनाकारण ताटकळत बसावे लागणार नाही.

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय आरोग्यसेवा अधिक सुलभ व सोयीस्कर पद्धतीने उपलब्ध व्हावी, या दृष्टीने जालना येथील सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय महिला रुग्णालयाच्या ओपीडीच्या वेळेत बदल करण्याच्या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी विनंती भास्कर आबा दानवे यांनी आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली

000

 

संबंधित पोस्ट

हिंद केसरी कुस्ती स्पर्धांसाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील – जिल्हाधिकारी संतोष पाटील

घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटीसाठी क्लस्टरला मंजुरी,माथाडींच्या साडेतीन हजार धोकादायक घरांचा पुनर्विकास होणार नवी मुंबई महापालिकेने प्रसिध्द केली अधिसूचना…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांच्या प्रयत्नांना यश

राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित-नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

हवामान विभागाचा इशारा! उत्तर भारतासह विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता …

स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतचे आश्वासन पूर्ण न झाल्याने आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव