vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

            मुंबई प्रतिनिधी :- भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड, दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने मराठी तसेच भारतीय कलाविश्वाने एक हरहुन्नरी आणि संवेदनशील कलाकार गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

   आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाचा अस्सल आविष्कार आणि संवेदनशील सामाजिक जाणिवांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या सहज आणि प्रभावी अभिनयाने त्यांनी अनेक व्यक्तिरेखा अजरामर केल्या. ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’ यांसारख्या कलाकृतींमधून त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीवर उमटवलेली अमीट छाप रसिकप्रेक्षकांच्या मनात सदैव कायम राहील.”

       नाना पाटेकर आणि पवार कुटुंबातील आपुलकीच्या संबंधांचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या. “नानांचे आदरणीय अजितदादांशी अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात ते नेहमी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी ही माझ्यासाठी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत वैयक्तिक आणि विशेष दुःखद आहे,” असे त्या म्हणाल्या.

   “अभिनयातील यशाच्या शिखरावर असतानाही नानांनी आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान कधीही सुटू दिले नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी समाजातील वंचित घटक, दुष्काळग्रस्त आणि शेतकरी बांधवांसाठी केलेले कार्य सदैव प्रेरणादायी राहील.कलेचा आणि सामाजिक सेवेचा ध्यास घेतलेल्या या अष्टपैलू, संवेदनशील कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

००००

संबंधित पोस्ट

लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!

vishwatmaklokswamivarta

जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट भारत-जपानच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नात्याची आकी आबे यांच्याकडून प्रशंसा

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर महास्वच्छता अभियान; आमदार-अधिकारी-कर्मचारी रस्त्यावर आणि वेरुळ चकाचक-स्वच्छता हीच ईश्वर सेवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी-स्वच्छतेत सातत्य राखणे गरजेचे- आ. प्रशांत बंब

vishwatmaklokswamivarta

मयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत दर्जेदार कामे करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांकडून बारामती तालुक्यातील विकासकामांची पाहणी