तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. यासाठी भारत सरकारचं एक डिजिटल व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’.
तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. यासाठी भारत सरकारचं एक डिजिटल व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’.
संचार प्रतिनिधी-तुमचा मोबाईल फोन हरवला तर किती अडचणी निर्माण होतात, याची कल्पना करा. तुमच्या मोबाईलमध्ये संपर्क क्रमांक, छायाचित्रं, महत्त्वाची कागदपत्रं आणि इतर अनेक मौल्यवान माहिती असते. एकदा मोबाईल हरवला की तो परत मिळण्याची आशा हळूहळू कमी होऊ लागते. मात्र, आता तसं राहिलेलं नाही.
तुमचा हरवलेला मोबाईल फोन तुम्हाला पुन्हा मिळू शकतो. यासाठी भारत सरकारचं एक डिजिटल व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. या व्यासपीठाचं नाव आहे ‘संचार साथी’. आतापर्यंत ‘संचार साथी’च्या संकेतस्थळावर 30 कोटींहून अधिक वेळा माहिती पाहण्यात आली आहे. तसंच,
या ॲपचे सुमारे ३ कोटी वेळा डाउनलोड झाले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १४०व्या भागात सांगितलं.