ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना आकाशवाणीतर्फे नाट्य श्रेणीतील प्रतिष्ठित ‘टॉप ग्रेड’ अर्थात सर्वोच्च श्रेणी प्रमाणपत्रानं सन्मानित…
बॉलीवूड प्रतिनिधी-ज्येष्ठ मल्याळम अभिनेते मोहनलाल यांना आकाशवाणीतर्फे नाट्य श्रेणीतील प्रतिष्ठित ‘टॉप ग्रेड’ अर्थात सर्वोच्च श्रेणी प्रमाणपत्रानं सन्मानित करण्यात आलं आहे. कोची इथं झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. २०२६ मध्ये आकाशवाणीच्या तिरुअनंतपुरम आणि कोची केंद्रांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या अखिल केरळ नभोवाणी नाट्य महोत्सवात दोन नाटकांना दिलेल्या आवाजाची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला. आकाशवाणीशी असलेलं आपलं अनेक वर्षांचं नातं या सन्मानामुळे अधिक दृढ झाल्याची भावना मोहनलाल यांनी व्यक्त केली