vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

दिवाळीनिमित्त विशेष संवाद: पु. ल. कट्टा येथे रंगणार ‘गोष्ट रांगोळीची’

दिवाळीनिमित्त विशेष संवाद: पु. ल. कट्टा येथे रंगणार ‘गोष्ट रांगोळीची’

मुंबई प्रतिनिधी: दिवाळीच्या सणात रंगांचे, संस्कृतीचे आणि कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे ‘पु. ल. कट्टा – गोष्ट रांगोळीची’ या विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजता अकादमीच्या कलांगण प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

घरोघरी रेखाटल्या जाणाऱ्या रांगोळीमध्ये दडलेली परंपरा, संस्कृती, इतिहास, पौराणिक व सामाजिक संदर्भ आणि एक कला म्हणून तिचे महत्त्व या सर्व विषयांवर या कार्यक्रमात रंजक संवाद साधला जाणार आहे. या विशेष सत्रात पत्रकार, निवेदिका, लेखिका श्रद्धा मोरे थोरवे आणि भारतीय प्रतीकशास्त्राचे अभ्यासक, रंगशास्त्र चिकित्सक व हस्तकला लेखक डॉ. गजानन शेपाळ हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून रसिकांशी संवाद साधणार आहेत.

रांगोळीच्या रंगांतून संस्कृतीचा सुंदर प्रवास उलगडून दाखवणारी ही मैफल कलाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून, या कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे. कलेचा आनंद आणि विचारांची मेजवानी असलेल्या या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अकादमीतर्फे करण्यात येत आहे.

००००

संबंधित पोस्ट

दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ व्याख्यानमाला रंगली

AIR Rising Stars  युवा आकाशवाणी संगीत संमेलनाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

६४ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाच्या विभागीय पारितोषिक वितरण सोहळ्यात रंगकर्मींचा होणार सन्मान३० जून रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे हौशी मराठी नाट्य, बालनाट्य व प्रथम मराठी एकांकिका स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांचा गौरव

राज्यपालांच्या हस्ते १५ युवा ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ सन्मानित-नव्या नवेली नंदा, मोना सिंग, जेनेलिया देशमुख सन्मानित

ज्ञानदीप कलामंच,ठाणे’तर्फे महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा व एकांकिका स्पर्धांसाठी नावनोंदणी सुरू

vishwatmaklokswamivarta

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta