रायगड-अलिबाग ( प्रतिनिधी- अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्या कार्यालयामार्फत दि.07 डिसेंबर 2026 रोजी, दुपारी ठीक दुपारी 03.00 वाजता डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे.
रायगड विभागातील डाक सेवेसंबंधित ज्या तक्रारी/समस्या 6 आठवड्यांच्या कालावधीत निकाली काढण्यात आलेल्या नाहीत, अशा टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर इत्यादी सेवांशी संबंधित तक्रारींचा डाक अदालतीमध्ये विचार करण्यात येईल.
तक्रारीमध्ये सविस्तर माहिती जसे की तक्रारीचा दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल कैली त्या अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा इत्यादी माहिती असणे आवश्यक आहे. इच्छुक ग्राहकांनी आपली तक्रार 2 प्रतींमध्ये, अधीक्षक डाकघर, रायगड विभाग, अलिबाग यांच्याकडे दि.04 डिसेंबर2026 पर्यंत पोहोचेल अशा रीतीने पाठवावी.
तसेच प्रादेशिक डाक अदालत (Regional Dak Adalat) दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी, पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र पनवेल यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात येते. त्यानुसार डिसेंबर 2026 महिन्याची प्रादेशिक डाक अदालत दि.04 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11.00,वाजता आयोजित करण्यात आली आहे. या डाक अदालतीमध्ये तक्रार मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांनी आपले अर्ज दि. 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित कार्यालयाकडे सादर करावेत