vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा…

दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा…

        सांगली, प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने व जबाबदारीने काम करावे. दुष्काळ निवारणासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना वेळेत लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज दिले         तासगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तहसील कार्यालय येथे झालेल्या या आढावा बैठकीस मिरज उपविभागीय अधिकारी विशाल यादव, तहसीलदार अतुल पाटोळे, गटविकास अधिकारी शेखर भिलारे, मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांच्यासह महसूल, कृषि, पशुसंवर्धन, महावितरण, जलसंधारण, पाटबंधारे यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि संभाव्य टंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतीनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा. तसेच शासनाच्या सूचनांनुसार गावनिहाय टंचाई निवारण कृती आराखडा तयार करावा. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे, तेथे आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावे. टँकरच्या फेऱ्यांवर नियमित देखरेख ठेवून नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

 

            जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, टंचाई परिस्थितीत नागरिक व पशुधन यासाठी आवश्यक पाणी व उपलब्ध पाणी यांचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण करावे. दुष्काळी स्थितीत जलसंधारण कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन कार्यवाही करावी. पाणीपुरवठा योजनांमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. तसेच शासनाच्या सूचनांनुसार सिमेंट काँक्रीट रस्ते, गटार कामे यासह जास्त पाणी लागणारी कामे हाती घेऊ नयेत, असे ते म्हणाले.

 

            कोणताही पात्र शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने चारा उपलब्धतेचे नियोजन करावे. संभाव्य टंचाई परिस्थितीत चारा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. शासकीय जमिनीवर पाणी उपलब्ध असेल त्या ठिकाणी चारा लागवड करावी. त्यासाठी महिला बचत गटांचा सहभाग घ्यावा. पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांकडेही विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

 

            जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, टंचाई स्थितीत जनजीवन विस्कळीत होऊ नये, यासाठी महसूल, कृषी, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा, पशुसंवर्धन आणि इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील उपाययोजनांचा नियमित आढावा घ्यावा. नागरिक आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे निराकरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले

            जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी यावेळी पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, चारा नियोजन, उपसा सिंचन योजनांचे आवर्तन, पुरवठा विभाग धान्य उपलब्धता, जलतारा, वनराई बंधारे, पीक नुकसानीची स्थिती, शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला

       यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या कार्यवाहीची सद्यस्थिती व आगामी नियोजन यांची माहिती दिली०००००

संबंधित पोस्ट

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रमांतर्गत मौजे बाहुळे येथे भात लावणी व शेतकरी संवाद संपन्न जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात रोटर चालवून केली चिखलणी; अधिकाऱ्यांनी घेतला भात लावणीचा आनंद

मुखेड तालुक्यात #भूकंपाचे सौम्य धक्के* *नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* 

vishwatmaklokswamivarta

सिडको वाळूज ग्रोथ सेंटर जमीन संपादनासाठी टीडीआर व सर्वसमावेशक आरक्षणाचा पर्याय – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप