vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

द्विभाषीक/संघटक पदाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

द्विभाषीक/संघटक पदाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

गडचिरोली, प्रतिनिधी : प्रकल्प अधिकारी अकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरीता आदिवासी भागांमध्ये योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता द्विभाषीक/संघटक म्हणुन सुशिक्षीत अनुसूचित जमातीच्या उमेदवारांची मानधनावर नेमणुक करणे. (प्रति दहा महिन्याकरीता)
  उमेदवारांसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे. पदवी/पदव्युत्तर धारक असावा, एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र, इंग्रजी टायपींग श.प्र.मि. 40 व मराठी टायपींग श.प्र.मि.30 प्रमाणपत्र असावा. गोंडी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मागील वर्षी (2024-25 व 2025-26 मध्ये) प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली येथे काम केलेचा अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रहिवासी हा प्रकल्प कार्यालय, गडचिरोली कार्यक्षेत्रातील/ पुढील तालुक्यातील असणे अनिवार्य आहे – 1 गडचिरोली, आरमोरी, कुरखेडा, कोरची, चार्मोशी, धानोरा व वडसा इत्यादी पात्रता असणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी दिनांक 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली कॉम्प्लेक्स एरिया, एल.आय.सी. ऑफिसजवळ, गडचिरोली येथे सादर करावे. असे आवाहन अरुण एम. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

यशकथा:तालसवाड्यातील महिला उद्योजिकेची भरारी: ‘माउली दुग्ध व्यवसाय’ ठरतोय यशाचा नवा मार्ग

आपले सरकार सेवा केंद्र वाटपाची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाईन प्रणालीद्वारे

महिलासक्षमीकरण-जिद्द आणि प्रशिक्षणाची जोड खाटेघरच्या सविता गायकर यांनी फुलवला मशरूम शेतीतून यशाचा मळा..

परतवाडा येथे ‘ॲडव्हान्स ब्युटी पार्लर’ प्रशिक्षण संपन्न; 32 महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप…

vishwatmaklokswamivarta

खानापूर-विटा प्रकल्पांतर्गत धोंडगेवाडी गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिवारा शाखा कार्यालयात डाक चौपाल कार्यक्रम संपन्न