vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोलीतील नवेगाव ठरले पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’**पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक; १०५ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी**गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान; अतिरिक्त सौर प्रकल्पांसाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर*

*गडचिरोलीतील नवेगाव ठरले पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’**पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक; १०५ घरांवर सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी**गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान; अतिरिक्त सौर प्रकल्पांसाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर*

 

गडचिरोली, प्रतिनिधी : केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यातील नवेगावने उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ होण्याचा मान मिळविला आहे. गावातील १०५ वीज ग्राहकांनी आपल्या घरांवर एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून स्वच्छ व अक्षय ऊर्जेच्या वापराला चालना दिली आहे. जिल्ह्यातील पात्र पाच गावांमध्ये झालेल्या स्पर्धेत सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापित केल्यामुळे नवेगावची प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली आहे.

नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या (MNRE) निर्देशानुसार पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज विकसित करण्यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी पाच हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमधून जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव आणि वडसा तालुक्यातील कुरूड या गावांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत या गावांची स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. ही स्पर्धा १७ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत राबविण्यात आली. गावागावांत अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि नागरिकांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता.

सौर ऊर्जा निर्मितीत नवेगावची आघाडी,स्पर्धेच्या कालावधीत नवेगाव येथील १०५ वीज ग्राहकांनी पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प स्थापित केले. या कामगिरीमुळे नवेगावने स्पर्धेतील इतर चार गावांच्या तुलनेत सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता उभारली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने नवेगावची जिल्ह्यातील मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड केली आहे.

सौर ऊर्जेच्या वापरामुळे पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्यास, वीज खर्चात बचत करण्यास आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. नवेगावची ही कामगिरी जिल्ह्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.

*गावाच्या विकासासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान*मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड झाल्यामुळे नवेगावला केंद्र शासनाच्या नवी व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक कोटी रुपयांचे आर्थिक प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानातून गावातील विविध शासकीय व निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत १७ ठिकाणी एकूण १०६ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. सदर अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी ते सादर करण्यात आले आहे.

या प्रकल्पांमुळे गावातील सार्वजनिक संस्थांमध्येही सौर ऊर्जेचा वापर वाढण्यास मदत होणार आहे. तसेच शासकीय व निमशासकीय इमारतींच्या वीज खर्चात बचत होण्याची अपेक्षा आहे.*अक्षय ऊर्जेच्या प्रसाराला नवी दिशा*नवेगावची मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून झालेली निवड ही जिल्ह्यातील अक्षय ऊर्जा वापराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे. घरगुती सौर प्रकल्पांच्या उभारणीनंतर आता सार्वजनिक इमारतींवरही सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित असल्याने गावात सौर ऊर्जेचा वापर अधिक व्यापक होण्यास चालना मिळणार आहे.नागरिकांचा सहभाग, पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेची अंमलबजावणी आणि जिल्हास्तरीय निवड प्रक्रियेच्या माध्यमातून नवेगावने मिळविलेले हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर गावांनाही सौर ऊर्जा स्वीकारण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

आरोग्यविषयक सर्व माहिती आभा कार्डद्वारे डिजिटल स्वरुपात – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सन्मान कर्तृत्वाचा’ सोहळा उत्साहातमाजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मान

vishwatmaklokswamivarta

एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई व पीक पेरणीचे नियोजन करा- प्रविणकुमार देवरे    • जिल्हाधिकारी यांनी घेतला विविध विषयाचा आढावा • शेतकऱ्यांनी घाईगडबडीत पेरणी करू नये; गाव पातळीवर जनजागृती करण्याचे निर्देश

परीक्षा प्रक्रियेत स्थैर्य, सुरक्षितता आणि पारदर्शकतेला प्राधान्य निश्चित वेळापत्रक, प्रश्नपत्रिका सुरक्षा, केंद्रीकृत तक्रार निवारण आणि परीक्षा केंद्रांच्या सुविधांवर भरविद्यार्थ्यांसह शिक्षक, पालक व भागधारकांशी सल्लामसलत; राज्यातून १८ हजारांहून अधिक ई-मेल्स प्राप्त…

vishwatmaklokswamivarta

ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नायक’ आणि ‘अर्जुन’ टीबीएमचा शुभारंभ- ठाणे-बोरिवली प्रवासाचे अंतर आता फक्त १५ मिनिटांवर

vishwatmaklokswamivarta