vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन

 

सातारा द प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत मौजे पाल, ता. कराड येथे १ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या मैला गाळ व्यवस्थापन (Fecal Sludge Management) प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे, मैला गाळाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे, तसेच नागरिकांना स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हा या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत पाल गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

सदर प्रकल्पात प्रामुख्याने कराड तालुक्यातील ५१ गावांचा समावेश असून, सेप्टीक टाक्यांमधील मैला संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी शासनामार्फत मैला वाहतुकीसाठी विशेष गाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.टायगर बायो फिल्टर तंत्रज्ञानाचा वापर

सदर प्रकल्पामध्ये जमा केलेल्या मैल्यावर टायगर बायो फिल्टर या आधुनिक प्रणालीद्वारे पाणी शुद्धीकरण आणि खतनिर्मिती केली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येणार असून, तयार होणारे खत विक्री करून ग्रामपंचायत पाल यांना देखील आर्थिक फायदा होणार आहे.

या उद्घाटन समारंभास आमदार मनोजदादा घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सुरेशतात्या पाटील, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्के, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपअभियंता जयदीप पाटील जिल्हा तज्ञ रवींद्र सोनवणे, राजेश भोसले,अजय राऊत दादासो यादव, रणजीत पाटील, शंकरकाका शेजवळ, शिरगावचे सरपंच संतोष यादव पाटील, नागठाणेचे उपसरपंच अनिल साळुंखे, उपअभियंता,बांधकाम विभाग,माधव पाटील, सतीश शिंदे, पापा गोरे, संतोष पाटील, ऋषिकेश गोरे, सरपंच धनंजय घाडगे, उप सरपंच सुनीलनाना काळभोर, सुरेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी डी आर केंगार यांच्यासह ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीच्या रकमेचा चौथा हप्ता जमा

vishwatmaklokswamivarta

लंडनच्या लेडी मेयर डेम ससून लँगली यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट उत्पादन क्षेत्रासोबतच ‘एज्युसिटी’ आणि ‘मेडीसिटी’ सारख्या संकल्पनांमधील संधींवर विशेष भर देण्यात येणार; मुंबई–लंडन सहकार्याला चालना

शिर्डी येथे होळीनिमित्त श्री साईबाबा संस्थान तर्फे समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट..

अवैध मुरूम वाहतूक करणारा टिप्पर व रेती उत्खनन करणारे जेसीबी जप्त; जाफ्राबाद तालुक्यात महसूल प्रशासनाची कारवाई

vishwatmaklokswamivarta

आगामी काळात स्पर्धा परीक्षेसाठी विक्रमी जागा-राज्यात नजीकच्या काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विक्रमी पदांची भरती केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta