vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

पोलीस स्मृतिदिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई, प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात शहीद झालेल्या पोलीस हुतात्म्यांना नायगाव पोलीस मुख्यालय येथील पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. असीम ध्येयनिष्ठेने कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या ३६ पोलीस अधिकारी आणि ११८ पोलीस अंमलदार अशा एकूण १५४ पोलीस हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतींना मी विनम्रपणे अभिवादन करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करून पोलीस हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण केले.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा, महापौर रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी यावेळी पुष्पचक्र वाहून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन केले. पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.

विविध देशांच्या दूतावासातील निमंत्रित, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह शहीद पोलिसांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांची भेट घेतली. अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) मधुकर पाण्डेय आणि विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखे यांनी पोलीस स्मृतीदिन संचलन कार्यक्रमाचे संयोजन केले.

ज्यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठेपोटी स्वतःचे प्राण अर्पण केले त्या शूर शहीद पोलिसांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी दि २१ ऑक्टोबर रोजी स्मृती संचलन केले जाते. दि. १ सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्य तसेच अर्ध सैनिक दलातील शहीद झालेल्या पोलिसांचा सन्मान करण्यासाठी या पोलीस स्मृतीदिन संचलनाचे आयोजन करण्यात आले.

0000

 

संबंधित पोस्ट

आज चौथ्या दिवशीही मुंबईत बीएसटी बसचा बेमुदत संप सुरूच  बेस्ट प्रवासी हैराण…

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींवर तात्काळ उपचार ; १०२ आणि १०८ रुग्णवाहिकांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण …

पश्चिम बंगालमध्ये भाजपची मोठी मुसंडी! भाजप २०० पार…

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी ‘जल अर्पण दिवस’ उपक्रम 💧

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही