vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर चुरणीगावात साधला महिलांशी संवाद; काटकुंभ आणि चुरणी आरोग्य केंद्राची पाहणी

मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,चुरणीगावात साधला महिलांशी संवाद; काटकुंभ आणि चुरणी आरोग्य केंद्राची पाहणी

अमरावती, प्रतिनिधी: एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी पालकांनी मुलींना आग्रहाने शिकवावे, बालविवाहाला पुढाकार घेऊन कृतीतून आळा घालावा. शिक्षणासोबतच आर्थिक प्रगती करून मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दिदी करण्यात येईल, असा विश्वास महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण व ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज महिला संवाद कार्यक्रमात व्यक्त केला.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांच्या उपस्थितीत चुरणी येथील आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार केवलराम काळे, अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने, प्रभुदास भिलावेकर, आरोग्य उपसंचालक डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारीसे उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी,राज्य व केंद्र शासनाच्या महिला आणि बालकांसाठी विविध योजना राबविण्यात येते. या कल्याणकारी योजना आणि कार्यक्रमांमुळे मेळघाटातील महिला व बालमृत्यू दरात घट झाली आहे. या भागातील संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण उत्तमरित्या वाढले आहे. गरोदर महिलांना प्रसुतीपूर्व आणि पश्चात सकस आहार व उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांसह आशा, अंगणवाडी सेविका दुर्गम भागातही घरोघरी जाऊन योजना प्रभावीपणे पोहचवित आहेत. या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता आणि नवजात बालकांची काळजी घेण्यात येत आहे.राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी योजनां’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिलांना शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्यात येत आहे. महिलांना वार्षिक १ ते ५ लाखांचे उत्पन्नlचे साधन मिळवून देत देशातील ३ कोटी महिलांना लखपती दिदी बनविण्याची महत्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे.राज्यातही ५० लाख लखपती दिदी बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या कार्याला अधिक गती देऊन प्रभावी अंमलबजावणीतून लखपती दिदी निर्माण करण्यावर भर देण्यात येईल.

यावेळी आमदार श्री. काळे, नगराध्यक्ष श्रीमती माथने, श्री. भिलावेकर यांनी मार्गदर्शन केले. काटकुंभ येथील साई महिला बचत गटाच्या प्रमुख सरोजनी नागले,काजलडोह येथील आशा गट प्रवर्तिका मालती ऊईके, चुरणी येथील अंगणवाडी सेविका शिला सुखदेवे यांनी मनोगत व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

मुंबईतील सर्वात मोठी दुर्दैवी घटना -विरार येथील बावीस वर्षे तरुणाचा लोकल रेल्वे चा फर्स्ट क्लास डब्यामध्ये हत्या आरोपी फरार पोलीस आरोपीचा शोध घेत आहे

प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून अभियान यशस्वी करा – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करा- मंत्री अतुल सावे यशदामध्ये महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

सोयाबीन व भुईमूग या पिकांसाठी मूल्य साखळी भागीदार निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

विविध कृषी पुरस्कारांकरीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन संगणक प्रणालीवर अर्ज करावेत

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ