vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

स्मार्ट’ अंतर्गत भेंडाळ्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ कोटी ४ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन**बियाणे स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध*

*‘स्मार्ट’ अंतर्गत भेंडाळ्यात शेतकरी उत्पादक कंपनीच्या १ कोटी ४ लाख रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन**बियाणे स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंगची सुविधा उपलब्ध*

गडचिरोली, प्रतिनिधी — चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे शुभगॉन शेतकरी उत्पादक कंपनीच्या सुमारे १ कोटी ४ लाख रुपयांच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. मुलचेरा येथील या कंपनीने भेंडाळा येथे उभारलेल्या प्रकल्पात यंत्रसामग्रीसाठी शेड, बियाणे स्वच्छता व प्रतवारी यंत्रणा आणि पॅकेजिंग यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

कृषी विभागाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत आत्मा, गडचिरोलीच्या जिल्हा अंमलबजावणी कक्षामार्फत या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. उद्घाटनप्रसंगी नागपूर विभागाच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पाच्या विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अंमलबजावणी कक्षाच्या प्रमुख तथा ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर आणि जिल्हा नोडल अधिकारी अर्चना कोचरे उपस्थित होत्या.

कडधान्यांची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकेजिंग केल्याने शेतमालाचे मूल्य वाढते आणि त्याला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल सामूहिकरीत्या संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि बाजारपेठेशी थेट जोडणी करणे यावर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी भर द्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

या वेळी विभागीय अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार सत्यपाल ठाकरे, उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरीपुंजे, चामोर्शीचे तालुका कृषी अधिकारी तुमडाम आणि मुलचेराचे तालुका कृषी अधिकारी पाटील यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, कंपनीचे संचालक, भागधारक, सभासद आणि शेतकरी उपस्थित होते. मुलचेराचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आकाश लवटे यांनी प्रास्ताविक केले, तर जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे वित्तीय प्रवेश सल्लागार कैलास शहारे यांनी सूत्रसंचालन केले.

संबंधित पोस्ट

श्री गजानन महाराज पालखीचे जालना महानगरपालिकेतर्फे भक्तिभावाने स्वागत महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांची उपस्थिती; ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

सांगली जिल्ह्यात विशेष महसूल लोकअदालतीचे आयोजनप्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीने व गतीने मार्गी लावावीत- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

vishwatmaklokswamivarta

महिलांसाठी स्मार्ट कार्ड सक्तीचे न ठेवता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून आधार कार्ड वापरण्यात यावा -शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

गणेशोत्सवात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठी पनवेल परिवहन कार्यालयाची कडक भूमिका प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, गैरवर्तन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

vishwatmaklokswamivarta

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..