
अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात बालविवाह निर्मूलन जनजागृती व शपथ कार्यक्रम संपन्न,
सातारा, प्रतिनिधी. 27 नोव्हेंबर हा बालविवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जनजागृतीचा दिवस म्हणून पाळला जातो. या अनुषंगाने दिनांक 18 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालहक्क संरक्षण व बालविवाह निर्मूलनाबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत आज दिनांक 20 नोव्हेंबररोजी सातारा येथील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात बालविवाह प्रतिबंधक शपथ व जनजागृती आयोजित कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना बालविवाह होऊ न देण्याची तसेच बालविवाहमुक्त समाजनिर्मितीसाठी सक्रिय सहभाग घेण्याची शपथ देण्यात आली.
सदर कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, शिक्षणविस्तार अधिकारी दत्तात्रय गिरी, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा सुचित्रा काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, चाइल्ड हेल्पलाइन कक्षाच्या केस वर्कर सुजाता शिंदे, महिला सक्षमीकरण येथील केंद्र व्यवस्थापक मृण्मयी जाधव, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.एन. पवार प्रशांत पाटील, पर्यवेक्षिका शशिकला घोरपडे, पर्यवेक्षक उपेंद्र घाडगे, कार्यक्रमाचे उपमुख्याध्यापक नियोजन आणि सूत्रसंचालन प्रितम फिसरेकर शिक्षकवृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.
000



