vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

आंबेघर येथे वित्तीय समावेशन अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वित्तीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासह पुनः केवायसी मोहिमेवर भर

आंबेघर येथे वित्तीय समावेशन अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वित्तीय योजनांचे लाभ पोहोचविण्यासह पुनः केवायसी मोहिमेवर भर

रायगड-अलिबाग, द प्रतिनिधी : राज्यातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध वित्तीय योजनांचे लाभ पोहोचविणे, बँक खात्याशी संबंधित केवायसी माहिती अद्ययावत करणे आणि नागरिकांना सुरक्षित व सुलभ बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वित्तीय समावेशन योजनांच्या संतृप्तीकरणासाठी तसेच पुनः केवायसी (Re-KYC) मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आंबेघर, ता. पेण येथे करण्यात आला

 भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC) आणि जिल्हा अग्रणी बँक कार्यालय, रायगड (बँक ऑफ इंडिया) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

दि. २१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईचे प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

 यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपमहाव्यवस्थापक डॉ. ज्योती सक्सेना, बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा, बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक तथा महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीचे संयोजक विवेक नाचणे, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक बिजेंद्र मलिक, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक धनंजय सिंह राठौर आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक उपस्थित होते.

याशिवाय युनियन बँक ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक राजेश कुमार मिश्रा व टी. रामानंद, बँक ऑफ बडोदाचे उपमहाव्यवस्थापक मनीष कुमार सिन्हा, बँक ऑफ इंडियाचे सहाय्यक महाव्यवस्थापक भरत सहाय यांच्यासह विविध बँकांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले

यावेळी मार्गदर्शन करताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक राकेश कुमार श्रीवास्तव यांनी बँक खात्यांशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी पुनः केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. बँकिंग सेवा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी ग्राहकांनी आपल्या खात्यांतील आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. तसेच डिजिटल आर्थिक व्यवहार करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे आणि सायबर फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधण्याचेही त्यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांनी ग्राहकांनी बँकेच्या उपलब्ध सुविधांचा वापर करून पुनः केवायसी प्रक्रिया वेळेत व सुलभतेने पूर्ण करावी, असे आवाहन केले. बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक बिजेंद्र मलिक यांनी बँकिंग सेवांची उपलब्धता आणि ग्राहकांसाठी असलेल्या विविध सुविधांची माहिती दिली.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक धनंजय सिंह राठौर यांनी केवायसी प्रक्रियेचे महत्त्व, ग्राहकांचे आर्थिक अधिकार आणि उपलब्ध बँकिंग सेवांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी पीक कर्ज वितरणासह ग्रामीण भागातील वित्तीय समावेशनामध्ये सहकारी बँकांची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदविण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या अभियानांतर्गत वित्तीय समावेशन योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे, बँक खात्यांमधील केवायसी माहिती अद्ययावत करणे, बँकिंग सुविधांबाबत जनजागृती करणे आणि डिजिटल आर्थिक व्यवहारांमधील सुरक्षिततेविषयी नागरिकांना मार्गदर्शन करणे यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी विविध ठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, सार्वजनिक, खासगी, सहकारी आणि प्रादेशिक बँकांचे प्रतिनिधी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

या अभियानामुळे नागरिकांना वित्तीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होण्यास, बँकिंग सेवांशी जोडले जाण्यास आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांबाबत जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.

000

संबंधित पोस्ट

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे जाफ्राबाद येथे मोफत गारमेंट मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

सैनिक कल्याण विभाग; लिपिक टंकलेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा १४ मार्च रोजी..

मूल्य साखळी भागीदारीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी,सहकारी संस्थांनी अर्ज 

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” योजनेंतर्गत इच्छुक संस्थांना प्रस्ताव सादर करण्याची 10 एप्रिल पर्यंत मुदत…

महिलांसाठी 23 मार्चला विशेष रोजगार मेळावा  

वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा प्रकल्पास राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिक पर्यावरणाची काळजी घेणारा ‘बदलाचे धागे अर्थात थ्रेड्स ऑफ चेंज’ उपक्रम सर्व शहरांसाठी अनुकरणीय..