vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी

कारागृहात रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम; बंद्यांना बांधली राखी

 

बुलढाणा, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना भूतकाळ विसरून सकारात्मक विचारांची रुजवणूक व्हावी, तसेच त्यांच्यात कुटुंबीयांप्रती आपुलकीची भावना निर्माण होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर राहण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, बुलढाणा यांच्या वतीने कारागृहात रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असल्याने कारागृहातील बंद्यांमध्ये कौटुंबिक भावना निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या सदस्यांनी बंद्यांसह कारागृह कर्मचाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. याप्रसंगी बंद्यांना व्यसनमुक्तीची शपथही देण्यात आली.कार्यक्रमाला कारागृह अधीक्षक मेधा बाहेकर, तुरुंगाधिकारी उमेश नाईक, तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्थेच्या ब्रह्मकुमारी उर्मिला दीदी, ब्रह्मकुमारी पुनम दीदी, डॉ. लता बाहेकर, सुशांतभाई व संतोषभाई उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार संजय मदरकर, कारागृह शिपाई राहुल पवार, आनंद पवार, दीपक वाघ यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

सकारात्मक विचार, व्यसनमुक्ती आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे बंद्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

00000

संबंधित पोस्ट

ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- विकसित भारत – जी-राम-जी मिशनचा जिल्हास्तरीय शुभारंभ विविध विकासकामांचाही शुभारंभ

उत्तर प्रदेशातील कौशाम्बी इथं फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, ५ जण गंभीर जखमी …

vishwatmaklokswamivarta

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta

लिंकिंग केल्यास कठोर कारवाई -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड खरीप हंगामासाठी बियाणे व खतांचा वेळेत व सुरळीत पुरवठा करण्याचे आदेश

बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई; डेंग्यू नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयांना अहवाल व रॅपिड टेस्ट रिर्पोटिंग बंधनकारक : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta