गोव्यातील ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात! ✨
बॉलीवूड प्रतिनिधी
गोव्यातील ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सोहळ्याला सुरुवात! झाली आहे ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने ‘फादरलँड’ या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांची रेड कार्पेटवरची खास झलक..
युद्धोत्तर जर्मनीतील विभाजनाचं चित्र उलगडणाऱ्या पावेल पावलिकोव्स्की यांच्या ‘फादरलँड’ चित्रपटाच्या भारतातील पहिल्या प्रदर्शनानं ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरुवात झाली.‘फादरलँड’ हा चित्रपट इफ्फीच्या ‘सीमांच्या पलीकडच्या कथा’ या संकल्पनेचं प्रतिबिंब असल्याचं चित्रपटाच्या निर्मात्या इवा पुश्चिन्स्का यांनी सांगितलं.भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्रीचा सर्वात भक्कम पाया म्हणजे दोन्ही देशांची संस्कृती, असं पिओत्र आंतोनी श्विताल्स्की यांनी नमूद केलं.