vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन

पुणे, प्रतिनिधी: जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नयेत, यासाठी ज्या अर्जदार/विद्यार्थ्यांनी अद्यापही वैधता प्रमाणपत्रातील त्रुटींची पूर्तता केलेली नाही, त्यांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरित संपर्क साधावा, तसेच त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी), महासंचालक तथा राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयक, श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय/आयुष शिक्षण आणि कला शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राखीव प्रवर्गातून प्रवेशासाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तरीही, समित्यांकडे अनेक विद्यार्थ्यांनी उशिराने अर्ज सादर केल्याचे दिसून आले आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांना त्रुटींची पूर्तता करण्याबाबत एसएमएस, ईमेल व पत्राद्वारे संबंधित समित्यांमार्फत कळवण्यात आले असतानाही, अनेक अर्जदार/विद्यार्थ्यांनी संबंधित समितीशी संपर्क साधलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्रुटींची पूर्तता करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारांचीच आहे.

अर्जदारांची गैरसोय होऊ नये यासाठी, आवश्यकतेनुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवावे, असे निर्देश महासंचालक, बार्टी तथा मुख्य समन्वयक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांना देण्यात आले आहेत.

००००

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी नियोजन करावे – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लातूर तालुक्यातील निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी निवडणूक संबंधित नोडल अधिकारी यांची बैठक

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवार जी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक्स या ट्विटरवर म्हंटले आहे

vishwatmaklokswamivarta

प्राणी कल्याणासाठी काम करणाऱ्यांना समितीत संधी,इच्छुकांनी 30 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जिल्हा प्राणीक्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत आवाहन

vishwatmaklokswamivarta

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta