
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन
ठाणे प्रतिनिधी -ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक संजय वाघुले, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त दीपक झिंजाड, वैभव आवारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक देखील उपस्थित होते.
———संविधान दिनानिमित्त कोर्टनाका व ठाणे रेल्वे स्थानक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते पवन कदम, अतिरिक्त आयुक्त 1 प्रशांत रोडे, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, दीपक झिंजाड यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
0000



