vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

धार्मिक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार

धार्मिक स्थळांवर भाविकांना मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले आभार

बुलढाणा, प्रतिनिधी केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे फुड स्ट्रीट हबला केंद्र सरकारच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत दोन्हीही धार्मिक स्थळी प्रत्येकी १ कोटी या प्रमाणे २ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या फुड स्ट्रीट हब सेंटर लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा देशांतर्गत १०० ठिकाणी राबविण्यात येणार आहे.

रस्त्यावरील खाद्यपदार्थामुळे होणारे आजार, अन्नातून होणारी विषबाधा रोखण्यासाठी अन्न हाताळणीची सुरक्षित मानके देशभर लागू करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण यांच्या वतीने देशभरात १०० फुड स्ट्रीट योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगांव येथे १ कोटी रुपये खर्चून आधुनिक स्वच्छ आणि “आरोग्यदायी” स्वच्छ फुड स्ट्रीट विकसित केल्या जाणार आहे. असेच फुड स्ट्रीट हब साई बाबांच्या शिर्डीतही उभारल्या जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील दोन्ही धार्मिक स्थळांवर हे फुड स्ट्रीट हब विकसित करण्याला मान्यता दिली आहे.

त्यामुळे विदर्भाच्या पंढरीत येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना तसेच साईबाबांच्या भक्तांना शिर्डीत दर्जेदार आणि पौष्टीक अन्न सेवा या हबच्या माध्यमातून मिळणार आहे. शिवाय लघु व्यावसायिक विक्रेत्यांना रोजगाराची चालना मिळणार आहे. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील शेगांव आणि शिर्डी येथे फुड स्ट्रीट हब मंजुर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आभार व्यक्त केले आहेत

संबंधित पोस्ट

हक्काच्या अधिकृत घरांच्या चाव्या मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही – हणमंत जगदाळे,क्लस्टर, डीपी रोड आणि रिंग मेट्रो प्रकल्पाला गती देण्याचा ठामपा सभागृह नेते हणमंत जगदाळे यांचा निर्धार,लोकमान्यनगर-शास्त्रीनगरवासियांचा निर्धार मेळावा उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्हा विद्युत समितीची बैठक-वितरण सुधारणा व वितरण हानी कमी करण्याच्यायोजनांना प्राधान्य द्यावे-खा.संदिपान भुमरे

भाजपाचा महापौर आज मुंबई महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची बिनविरोध निवड. महायुतीचे महापौर आणि उपमहापौर मुंबईच्या विकासाला नवी दिशा देतील – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 14 जून रोजी; जालन्यातील 17 परीक्षा  केंद्रांच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश..

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील साखळी बु. गावासाठी टँकर मंजूर

सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध शासकीय योजनांचीजालना जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा- अध्यक्ष शेरसिंग डागोर