vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईत १ व २ डिसेंबर रोजी ‘कॅनडा-भारत फ्यूचर स्किल्स समिट २०२६’चे आयोजन*

नवी मुंबईत १ व २ डिसेंबर रोजी ‘कॅनडा-भारत फ्यूचर स्किल्स समिट २०२६’चे आयोजन*

ठाणे, प्रतिनिधी):महाराष्ट्रातील युवकांना आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि भविष्यातील औद्योगिक रोजगार संधींसाठी सज्ज करण्यासाठी ‘कॅनडा-भारत फ्यूचर स्किल्स समिट २०२६’ ही आंतरराष्ट्रीय परिषद १ व २ डिसेंबर २०२६ रोजी वाशी, नवी मुंबई येथील सिडको ऑडिटोरियम अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे होणार आहे. ‘Future of Manufacturing in India 2026 – Talent, Technology, Transformation’ या संकल्पनेवर आधारित ही परिषद ITM स्किल्स युनिव्हर्सिटी आणि कॅनडातील हंबर पॉलिटेक्निक यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच ग्लोबल अफेयर्स कॅनडा अंतर्गत ‘कॅनडा फंड फॉर लोकल इनिशिएटिव्हज’ (CFLI) च्या सहकार्याने आयोजित केली जात आहे. रोबोटिक्स, ऑटोमेशन, एआय (AI), स्मार्ट फॅक्टरी आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानातील बदलांसाठी आवश्यक कौशल्ये युवकांमध्ये रुजविणे तसेच भारत-कॅनडा शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य दृढ करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.

 मंगळवार, १ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ITM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. रमणा यांनी निमंत्रण दिले आहे. या परिषदेस कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा आणि वरिष्ठ अधिकारी मनीषा वर्मा (भा.प्र.से) उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतातील कॅनडाचे उच्चायुक्त ख्रिस्तोफर कूटर, मुंबईतील कॉन्सुल जनरल जेफ डेव्हिड यांच्यासह कॅनडाचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी, हंबर ग्लोबलच्या डीन डॉ. डायन सिम्पसन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, ITM चे प्रा. डॉ. आर. एस. एस. मणी व नितीन पुत्वा, विविध उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत

 परिषदेच्या पहिल्या दिवशी (१ डिसेंबर) स्मार्ट फॅक्टरी, रोबोटिक्स, ऑटोमेशन, इंडस्ट्री ४.० ते ५.०, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, महिला नेतृत्व यांवरील चर्चासत्रे तसेच उत्पादन तंत्रज्ञान व एआयवरील संशोधन निबंध सादरीकरण होणार आहे.

   दुसऱ्या दिवशी (२ डिसेंबर) ‘School Innovation Challenge’ अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कार्यरत IoT प्रकल्पांचे प्रदर्शन आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

     अधिक माहिती व नोंदणीसाठी www.itm.edu/lp/humber-cfli या संकेतस्थळावर तसेच समन्वयासाठी श्री. सिद्धू हिरेमठ (९०२२९४५९३७, sidhu@itm.edu) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

दादर येथील श्री हनुमान मंदिर येथे अयोध्येतील श्रीराम मंदिर लुटीविरोधात एल्गार करून, रामरक्षा महाआरती- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उभाठा…

भविष्यातील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· *नवी दिल्लीतील सीआयआयच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्राच्या प्रगतीचे सादरीकरण*

कौशल्याधारित शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण करा – जिल्हाधिकारी किशन जावळे‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’चा शुभारंभ; रायगडमध्ये जे.एस.एम. महाविद्यालयात जिल्हास्तरीय उपक्रमास प्रारंभ

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

शिक्षक मतदारसंघ मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज वाहतुकीत अंशतः बदल ; बियाणी चौक ते तपोवन गेट मार्ग बंद राहणार

vishwatmaklokswamivarta

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीम – शहराच्या अंतर्गत भागातही मुख्य रस्त्यांची सखोल स्वच्छता..