vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹1.25लाखापर्यंत शिष्यवृत्तीची संधी**नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*.

*9 वी व 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ₹1.25लाखापर्यंत शिष्यवृत्तीची संधी**नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

           *ठाणे,द प्रतिनिधी :- केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘टॉप क्लास स्कूल शिष्यवृत्ती’ योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र शाळा व महाविद्यालयांमधील इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC) तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेंतर्गत गुणवत्तेनुसार निवड होणाऱ्या इयत्ता 9 वीच्या पात्र विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 75 हजार रुपयांपर्यंत, तर इयत्ता 11 वीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 1 लाख 25 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे

सदर योजना केंद्र शासनाच्या नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (NSP) कार्यान्वित करण्यात आली असून, ठाणे जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची यादी संबंधित शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील शाळा व महाविद्यालयांमध्ये इयत्ता 9 वी व 11 वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि मागील शैक्षणिक वर्षात 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2026 ही आहे. मुदत संपण्यापूर्वी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज पोर्टलवर भरून त्यांची आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे कार्यालयाचे सहायक संचालक यांनी केले आहे.

जिल्ह्यातील एकही पात्र विद्यार्थी या महत्त्वपूर्ण शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित शाळा व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तातडीने कार्यवाही करावी. या योजनेबाबत अधिक माहिती व तांत्रिक मार्गदर्शनासाठी इच्छुक विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक संस्थांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, ठाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

000000000000

संबंधित पोस्ट

शिक्षक मतदारसंघ मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर आज वाहतुकीत अंशतः बदल ; बियाणी चौक ते तपोवन गेट मार्ग बंद राहणार

vishwatmaklokswamivarta

जालना येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या खरीप 2025 विमा साठी बेमुदत मुक्काम ठोको आंदोलन 

महिला व चिमुकला बेपत्ता; धाड पोलिसांकडे मिसिंग दाखल

बसमध्ये मिळणार विमानातील सुविधा पाच तरूणांनी एकत्रित येत घडविली ट्रॅव्हल्स क्षेत्रात क्रांती

vishwatmaklokswamivarta

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय वास्तूस आकर्षक रोषणाईव्दारे तिरंगी झळाळी 

vishwatmaklokswamivarta

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष