vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नव्या दिल्लीत जंतर-मंतरवर काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीने निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार राजीनाम्याच्या मागणी करिता जोरदार आंदोलन केले

नव्या दिल्लीत जंतर-मंतरवर काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीने निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार राजीनामेच्या मागणी करिता आंदोलन केले..

नवी दिल्ली प्रतिनिधी-आज नव्या दिल्लीत राजकारणाचा धडाका पाहायला मिळाला जंतर मंतर वरील काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या निवडणूक आयोगाच्या कारभाराच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणी जोरदार धडक मोर्चा काढण्यात आला

 सदर मोर्चा हा निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘इंडिया आघाडीच्या सर्व प्रमुख खासदारांनी आज संसदेपासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत जोरदार मोर्चा काढत निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी जाहीर टीका केली दरम्यान दिल्ली पोलिसांनी सदर मोर्चा रोखण्याचा प्रयत्न केला असता काँग्रेस नेते राहुल गांधी प्रियंका गांधी आणि इतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडून बसले आणि त्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेण्याची मागणी केली

या मोर्चाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. या आंदोलनात काँग्रेस खासदार प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक वरिष्ठ खासदार सहभागी झाले होते.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रसिद्धीपत्रक *महसूलमंत्र्यांच्या बैठकीत राज्यातील मंदिर विश्वस्तांनी नोंदवला ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारुपाला’ तीव्र विरोध,सूचना आणि हरकती यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढीचे महसूलमंत्र्यांचे आश्वासन !

vishwatmaklokswamivarta

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत हेल्लेनिक प्रजासत्ताकाच्या संरक्षण मंत्र्यांसोबत केली द्विपक्षीय चर्चा

vishwatmaklokswamivarta

डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेश सुरू 

लातूर जिल्ह्यात खत आणि बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध; साठेबाजी किंवा लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर होणार सक्त कारवाई!

निरोगी शरीर आणि सुदृढ मन हेच समृध्द जीवनाचे खरे आधार- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अदिती उदय कदम- जिल्हा व सत्र न्यायालय, सांगली येथे आरोग्य दिन साजरा

चिखली तालुक्यात अनधिकृत पाणी उपशावर बंदी जलस्रोतांच्या सुरक्षेसाठी भरारी पथके कार्यरत; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई