vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, प्रतिनिधी: मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढविण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल तंत्रज्ञान, क्वांटम कॉम्प्युटिंग, स्पेस टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्येही मराठीचा वापर वाढविण्याचे आवाहन त्यांनी केले

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ आणि ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस’ कार्यक्रमाचा चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर्सी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृहात उत्साहात शुभारंभ झाला. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, मुंबईच्या महापौर रितू तावडे, विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्यासह मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठीप्रेमी उपस्थित होतेमराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा अभिमानाचा क्षण

मराठी भाषा प्राचीन आणि अभिजात आहेच; मात्र तिला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेची अधिकृत मान्यता मिळणे हा मराठी भाषकांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय पातळीवर विशेष अधोरेखित स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या संकल्पनेसोबत स्वभाषेलाही महत्त्व दिले. राज्यकारभारात मराठीचा वापर वाढविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यातून मराठीच्या प्रशासकीय वापराला नवी दिशा मिळाली, अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी करून दिली.

मराठी शब्दसंपदा वाढविण्याची गरज

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा १३वा क्रमांक असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठी ही जागतिक स्वरूपाची भाषा आहे. विसाव्या शतकात तयार झालेल्या मराठी ज्ञानकोश आणि शब्दरत्नाकरामध्ये ११ ते १३ लाख शब्द असल्याचा उल्लेख त्यांनी केला. तुलनेत ऑक्सफर्ड शब्दकोशात सुमारे सहा लाख शब्द, तर मँडरिन, स्पॅनिश आणि फ्रेंचसारख्या भाषांमध्ये साधारण तीन ते साडेतीन लाख शब्द असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या प्रकाशित मराठी शब्दकोशात सध्या सुमारे तीन लाख शब्द आहेत. त्याच्या पुढील आवृत्त्या तयार करून शब्दसंपदा १३ लाख शब्दांपर्यंत नेण्याचे काम करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.

मराठीच्या समृद्ध शब्दसंपदेचा उल्लेख करताना फडणवीस यांनी मराठी ज्ञानकोश आणि शब्दकोशांच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. विविध कोशांमध्ये लाखो मराठी शब्द नोंदविले गेले असून, ही शब्दसंपदा मराठीच्या समृद्ध भाषिक परंपरेचे दर्शन घडवते, असे त्यांनी सांगितले. मराठीचा हा शब्दवैभव केवळ अभिमानाचा विषय न राहता आधुनिक ज्ञाननिर्मितीमध्येही त्याचा प्रभावी वापर झाला पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संकल्पना मराठीत उपलब्ध झाल्यास मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा बनेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोस्ट

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज किनारी मार्गावरील संगीत रस्त्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा #पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील मढ गावासाठी टँकर मंजूर

राष्ट्रीय छात्रसेना शिबिरासाठी27 मे पर्यंत दरपत्रके सादर करण्याबाबत आवाहन

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोट निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार- अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस