vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला..

राज्य प्रतिनिधी- गडचिरोली | पोलीस मुख्यालय-महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. श्री. सदानंद दाते यांचा काल गडचिरोली दौरा पार पडला.

या दौऱ्यादरम्यान पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात कसनासूर–बोरीया येथे माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या एकूण 31 पोलीस अधिकारी व अंमलदारांना शौर्यपदक प्राप्त झाले असून, मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते त्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 05 पोलीस उपनिरीक्षकांना गृह विभाग, महाराष्ट्र शासनाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. या अधिकारी व अंमलदारांचा पदोन्नती समारंभ मा. पोलीस महासंचालकांच्या हस्ते पार पडला.

यावेळी मा. पोलीस महासंचालकांनी शौर्यपदक व पदोन्नती प्राप्त अधिकारी व अंमलदार तसेच उपस्थित विशेष अभियान पथकातील जवानांशी संवाद साधत माओवादविरोधी अभियानाबाबत सविस्तर चर्चा केली. जवानांच्या अडचणी जाणून घेत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी ते म्हणाले,“गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या अधिकारी व जवानांचे बलिदान नेहमी स्मरणात राहील. अवघड परिस्थितीतही मोठे उद्दिष्ट समोर ठेवून प्रामाणिकपणे कार्य करावे.”

मा. पोलीस महासंचालकांनी सर्व पदोन्नती व शौर्यपदक प्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून उपस्थित सर्वांचे मनोबल उंचावणारे मार्गदर्शन केले.

000000

संबंधित पोस्ट

जिल्हा क्रीडा संकुलातील विविध विकास कामांसाठी पात्र निविदाकरास तात्काळ कार्यारंभ आदेश द्यावेत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील   

vishwatmaklokswamivarta

दहावी-बारावी पुरवणी परीक्षेसाठी समुपदेशन सेवा 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी-मुंबईत झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. 

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील पिंपरी-चिंचवड विभागातील दुर्दैवी घटना-दरड कोसळल्याप्रमाणे कचरा इमारतीवर आला; पिंपरीमध्ये इमारत कोसळल्यानंतर अधिकाऱ्याने सांगितला घटनाक्रम, आतमधून मदतीसाठी आवाज….

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सुरू करण्यात आलेल्या दादर–नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बससेवेचा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते प्रारंभ