vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ – ठाणे”

राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा २०२६-२७ – ठाणे”

                ठाणे, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे; जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विदयमाने प्रतीवर्षी तालुकास्तर / जिल्हास्तर / विभागस्तर / राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तर अशा विविध स्तरांवरील स्पर्धांचे आयोजन खेळ निहाय आणि वयोगटनिहाय करण्यात येत असते.

     त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याकडे सन 2026-27 या वर्षामधील राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. सदरहु स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी, ठाणे तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा आयोजन समिती यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीस बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीमध्ये स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीने विविध विषयांचा आढावा घेऊन स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

 या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील आठ विभागामधून 96 खेळाडु आणि त्यांचे 16 संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक येणार आहेत. सदर राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा ही दिनांक 25 ते 27 नोव्हेंबर 2026 ह्या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे. ही स्पर्धा तालुका क्रीडा संकुल, कोपरी -ठाणे बारा बंगला परिसर, ठाणे (पुर्व) या ठिकाणी संपन्न होणार आहे.

    जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे कार्यालयामार्फत या अगोदरही विविध खेळांच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील आठ विभागामधुन प्राविण्यप्राप्त खेळाडु सहभागी होऊन त्यांच्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन या स्पर्धेच्या निमित्ताने करणार आहेत. तसेच या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमधील प्राविण्यप्राप्त खेळाडु हे भारतीय शालेय खेळ महासंघ (SGFI) मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

      त्याअनुषंगाने महाराष्ट्रामधील विविध भागामधील उत्कृष्ठ खेळाडूंचे क्रीडा कौशल्य पाहण्याची अपुर्व संधी ठाणे जिल्ह्यातील खेळाडु, पालक व क्रीडा प्रेमींना मिळणार आहे, यास्तव या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला खेळाडु, पालक आणि क्रीडा प्रेमींनी आवर्जुन भेट दयावी, असे आवाहन डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्रसे.) जिल्हाधिकारी, ठाणे आणि सुवर्णा बारटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांनी केले आहे.

 

000000000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बुलढाण्यात भव्य सामूहिक योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

क्रीडा प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया सुरू; खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी…

खेळाडूंसाठी १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

कोल्हापुरचा अजिंक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता-नेरूळच्या निरंत पाटील याने पटकाविला नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान

राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत पुणे विभागाला वैयक्तिक गटात प्रथम व तृतीय क्रमांकआठ विभागांतील ३४ खेळाडूंचा सहभाग; विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्यायच्या राज्यस्तरीय स्पर्धेतअमरावती विभागाला सर्वसाधारण विजेतेपद