vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेशीम शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षणपरभणीत सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन;शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रेशीम शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षणपरभणीत सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन;शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी, प्रतिनिधी: रेशीम शेतीचा विस्तार करण्यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, उत्पादन वाढविण्याच्या पद्धती समजाव्यात आणि रेशीम उद्योगातून आर्थिक प्रगती साधता यावी, या उद्देशाने केंद्रीय रेशीम मंडळाच्या सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत परभणी येथे लाभार्थी सक्षमीकरण निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन आज सोमवारी (दि. २३) अतिरिक्त जिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्या हस्ते झाले.जिल्ह्यासाठी ५० शेतकऱ्यांच्या सहभागाचे उद्दिष्ट असताना तब्बल ८५ शेतकऱ्यांनी नावनोंदणी करून प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शेतकरी भवन परिसरातील शेतकरी निवास येथे हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे संचालक (संशोधन) डॉ. भगवानराव असेवार, केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ ‘डी’ अशोक जाधव, माजी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (एलडीएम) सुनील हतेकर आदी उपस्थित होते.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन करून सहभागी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. भगवानराव असेवार यांनी रेशीम शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ अशोक जाधव यांनी रेशीम शेतीच्या विविध तांत्रिक बाबींची माहिती दिली. माजी एलडीएम सुनील हतेकर यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे हे मंत्रालयीन बैठकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी प्रशिक्षणासाठी पाठविलेला शुभेच्छा संदेश विकास अधिकारी यांच्यामार्फत वाचून दाखविण्यात आला.

या प्रशिक्षणात रेशीम शेतीशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दररोज रेशीम विभागाचे अधिकारी आणि कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्या चार मार्गदर्शन सत्रांसह एका प्रात्यक्षिक सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तुती लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, जमिनीची निवड, माती परीक्षण, हवामान, रेशीम कीटक संगोपन तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे.

उद्घाटनानंतर दुपारच्या सत्रात केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ अशोक जाधव यांनी नवीन तुती लागवडीचे तंत्रज्ञान, जमिनीची निवड, माती परीक्षण आणि हवामान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनीही प्रशिक्षणात उत्साहाने सहभाग घेत विविध विषयांची माहिती जाणून घेतली.पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या ५० लाभार्थी शेतकऱ्यांसाठी दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात जालना येथील कोष बाजारपेठ तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रगतिशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देण्यात येणार आहे. या भेटीतून प्रत्यक्ष रेशीम शेतीचा अनुभव आणि यशस्वी शेतीचे तंत्र समजून घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे

सिल्क समग्र-२ या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालय, परभणी यांच्यामार्फत या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाचा उद्देश आणि नियोजनाची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. संजोग बोकन आणि सागर मिसाळ यांनी केले.प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी शेतकऱ्यांनी पाचही दिवस प्रशिक्षणाला उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी एस. बी. वराट यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रेशीम कार्यालयातील सागर मिसाळ, गजानन काचगुंडे, लिंबाजी वागदकर, जोगदंड, भालेराव, मुंडे, वाघ, टापरे आणि जमदाडे यांनी परिश्रम घेतले.

***

संबंधित पोस्ट

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने कर्ज वाटप, स्वयंरोजगार मेळाव्याचे 30 एप्रिल रोजी आयोजन 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान असणे अनिवार्य असून, या नियमाची अंमलबजावणी उद्या, २० ऑगस्टपासून करण्यात येणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

२० व २१ जून रोजी ‘स्पेशल ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह’; १० वी पास ते पदवीधरांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांची शोकसंवेदना

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम…