vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहावी-#जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियापाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2027’ स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज• गावागावांत श्रमदानातून #जलसंधारणाची कामे उभारण्यावर भर• सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे #निर्देश

लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी राहावी-#जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियापाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2027’ स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज• गावागावांत श्रमदानातून #जलसंधारणाची कामे उभारण्यावर भर• सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे #निर्देश

राज्य प्रतिनिधी-#दुष्काळाच्या संकटावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर, प्रभावी जलव्यवस्थापन आणि जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देणे आवश्यक आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर शाश्वत उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक गावात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे उभी राहिली पाहिजे. यासाठी शासन, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या भागीदारीतून पाणी फाउंडेशनतर्फे सन 2027 मध्ये राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची व्यापक लोकचळवळ उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ‘सत्यमेव जयते #वॉटरकप 2026-27’ स्पर्धेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जलसंधारण, जलसंवर्धन आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

 बैठकीस अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे, पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व ओळखून त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता दीर्घकालीन आणि शाश्वत जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. यासाठी गावपातळीवर नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. श्रमदानाच्या माध्यमातून गावागावांत जलसंधारणाची कामे उभी राहिल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावीपणे मात करणे शक्य होईल.

#जलसंधारणाच्या कामांना लोकचळवळीचे स्वरूप देण्याची गरज दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांबरोबरच नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. विशेषतः गावातील प्रत्येक घटकाने श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांमध्ये योगदान दिल्यास सामूहिक प्रयत्नांतून मोठे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धा ही केवळ स्पर्धा न राहता जलसंवर्धनाविषयी जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्याचे प्रभावी माध्यम ठरावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी व्यक्त केली.

वॉटर कप स्पर्धेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी पाणी फाउंडेशनच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. जलसंधारणाच्या क्षेत्रात लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या कामांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी वॉटर कप स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून काम करावे, असे निर्देश दिले. दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व असून, या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय आणि लोकसहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

वॉटर कप स्पर्धेच्या नियम व कार्यपद्धतीचे सादरीकरण,पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी बैठकीत ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेची संकल्पना, नियम आणि कार्यपद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली. जलसंधारणाच्या कामांमध्ये विविध शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सहकार्याने आणि सामूहिक प्रयत्नांतून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणावर कामे उभी राहू शकतात. या उपक्रमात प्रशासन आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतल्यास जलसंवर्धनाच्या चळवळीला अधिक बळ मिळेल, असा विश्वासही डॉ. पोळ यांनी व्यक्त केला. बैठकीदरम्यान पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून यापूर्वी राबविण्यात आलेल्या विविध जलसंधारण उपक्रमांची आणि लोकसहभागातून झालेल्या कामांची माहिती ध्वनिचित्रफितीद्वारे उपस्थितांना देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त समता चित्ररथ, संविधान जागृती बाईक रॅली उत्साहात संपन्न

जालना जलकवच अभियानांतर्गत बदनापूर येथे रेशीम शेती कार्यशाळा संपन्न.

पल्स 2027’ साठी स्वतंत्र कंपनी व दुहेरी समित्यांची स्थापन शासन निर्णय लवकरच     – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल) आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक…

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेचे अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन; विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड