vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

 

*कोल्हापूर दि : प्रतिनिधी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मौजे सांगाव व शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय पिंपळगाव खुर्द येथील महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांना डीम्ड विद्यापीठांमधील महाविद्यालयांच्या धर्तीवर दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.*

 कागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय संकुल, महात्मा फुले मार्केट,श्रीमंत बापुसाहेब महाराज चौक येथे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,मौजे सांगाव 100 विद्यार्थी आणि शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, पिंपळगाव खुर्द येथील100 विद्यार्थी पहिली बॅच प्रवेश समारंभ व स्वागत सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुलगुरु डॉ. व्यंकट गिते, नगराध्यक्षा सविता माने, तहसिलदार अमरदीप वाकडे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे , शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, न.पा मुख्याधिकारी अजय पाटणकर, आरोग्य समिती सभापती प्रविण काळबर, सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील,पिंपळगांव खुर्दचे सरपंच शितल नवाळे, केडीसी बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळ माजी संचालक युवराज (बापू) पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले,वैद्यकीय शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून या मतदारसंघात तीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. शासकीय आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयातील सर्व जागा भरल्या जाणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे.डीम्ड विद्यापीठांमधील महाविद्यालयांच्या धर्तीवर या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणे ही माझी जबाबदारी असून ती पूर्ण केली जाईल.

   सांगाव व पिंपळगाव खुर्द येथील नागरिकांनी या दोन्ही महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी यावेळी ग्रामस्थांचे आभार मानले. तसेच वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनांतून 30 टक्के नागरिकांना लाभ मिळाल्याचेही सांगितले .

          कुलगुरू डॉ.व्यंकट गीते म्हणाले, आयुर्वेद आणि शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाच्या माध्यमातून सर्वोत्तम डॉक्टर होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या संधीचे सोने करा. केवळ डॉक्टर होण्यापुरते मर्यादित न राहता उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या डोळ्यांतील वेदना आणि भावना समजून घ्यायला शिका.रुग्णांशी नम्रतेने संवाद साधा त्याचबरोबर आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा तसेच नाविन्यपूर्ण संशोधनाला प्राधान्य द्या असे आवाहन करून आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत ‘कुलगुरू संवाद यात्रा’ सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली.

      यावेळी मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (डायट इमारत) आणि शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय (महात्मा फुले मार्केट) येथे स्मार्ट क्लासरुम आणि सुसज्ज ग्रंथालय विभागाचे लोकार्पण करण्यात आले .यावेळी नगराध्यक्षा श्रीमती माने यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.

              प्रारंभी अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे यांनी प्रास्ताविक केले तसेच यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी कु. निकिता चौधरी व सार्थक वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.प्रशांत मोहिते तर आभार प्रदर्शन डॉ. किशोरकुमार मडावी यांनी केले

        या कार्यक्रमासाठी विविध संस्थाचे पदाधिकारी,कागल न.पचे नगरसेवक,वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी,इतर प्राध्यापक , पालक व विद्यार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

संबंधित पोस्ट

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य प्रशिक्षणावर भर : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

काशीद समुद्रकिनारी पुन्हा दोन पर्यटकांचे प्राण वाचवण्यात यश…