vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राज्यभर प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राज्यभर प्रभावीपणे राबवावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणारे ‘हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’ हे विशेष अभियान राज्यभर प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

#संतरविदास महाराजांचे मानवता, समता, श्रमप्रतिष्ठा, करुणा आणि सामाजिक न्यायाचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवून सामाजिक सलोखा व बंधुभाव दृढ करण्यावर भर देण्यात येणार आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम १३ व १४ फेब्रुवारी २०२७ रोजी नाशिक येथे प्रस्तावित आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि बार्टीच्या महासंचालिका डॉ. दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, तसेच नियोजन व अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील १ लाख ८ हजार १३९ शाळा, ५ हजार ८४१ महाविद्यालये, ६५ विद्यापीठे आणि ११ हजार १५० सार्वजनिक ग्रंथालयांना अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे. निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, संतसाहित्य वाचन, संशोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरोग्य तपासणी, रक्तदान, व्यसनमुक्ती, स्वच्छता जनजागृती, श्रमवीर सन्मान, महिला आर्थिक स्वावलंबन आणि युवा सेवा सप्ताह असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या दहा कोटींहून अधिक भाविक व नागरिकांपर्यंत संत रविदास महाराजांचे विचार आणि अभियानाचा संदेश पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विभागनिहाय मर्यादित न ठेवता एकाच व्यासपीठावर पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी मांडली.

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, नव्या क्षेत्रांत कार्यरत युवकांना आर्थिक सहाय्य तसेच युवकांच्या नवकल्पना व उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना, स्वतंत्र निधी किंवा विश्वस्त संस्था स्थापन करण्याची सूचना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी मांडली. तसेच संत रविदास महाराजांच्या साहित्याचे संकलन करून त्याचा राज्यभर प्रसार करण्यावर त्यांनी भर दिला.

राज्यातील ६५० गावांमध्ये विचारसभा व वृक्षारोपण, प्रत्येक जिल्ह्यात प्रचार वाहनांद्वारे संत रविदास महाराजांच्या विचारांचा प्रसार, तसेच ‘डिजिटल रविदास ६५०’, ई-ग्रंथालय, डिजिटल प्रश्नमंजुषा आणि ६५० प्रेरणादायी व्हिडिओ कथांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक येथील मुख्य कार्यक्रमात बेगमपुरा संकल्पना, संत संगम, सांस्कृतिक कार्यक्रम, समता महामंच, संत रविदास वारसा प्रदर्शन आणि सामुदायिक अन्नसेवा यांचा समावेश प्रस्तावित आहे.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, संत रविदास महाराजांच्या नावाने विशेष योजना आणि त्यांच्या साहित्याचा व्यापक प्रसार करण्याबाबतही बैठकीत सूचना मांडण्यात आल्या.

000000

संबंधित पोस्ट

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

बांगलादेशमध्ये महिला आणि मुलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत युनिसेफने ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच दोषींना शिक्षा होण्याची हमी देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले

घनकचरा व्यवस्थापन नियमाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक-फौजदारी कारवाई कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना  …

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

जालना जिल्ह्यात १८ हजार २७६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,- मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक, उपोषण मागे घेण्याचे आवाहन- प्राप्त अर्जांपैकी ९९.९ टक्के अर्ज मंजूर; एकही अर्ज प्रलंबित नाही- महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन- अंतरवाली सराटीच्या विकासावर लक्ष देणार

vishwatmaklokswamivarta

कोकणा सह  मध्य महाराष्ट्रात मुंबई उपनगरात आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta