vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

सीवूड्स सेक्टर ४६-४८ मधील पोस्ट कार्यालयाची दयनीय अवस्था – सिडको व टपाल विभागाने लक्ष घालण्याची मागणी*

*सीवूड्स सेक्टर ४६-४८ मधील पोस्ट कार्यालयाची दयनीय अवस्था – सिडको व टपाल विभागाने लक्ष घालण्याची मागणी*

*नवी मुंबई, प्रतिनिधी-भारताला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली, तरी सिडको वसाहतीतील सरकारी कार्यालये व पोस्ट कार्यालये आजही दयनीय अवस्थेत आहेत. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सीवूड्स सेक्टर ४८ व ४६ मधील महात्मा फुले चौक येथील पोस्ट कार्यालय.

सूर्योदय को-ऑप. हौसिंग सोसायटीसमोर, लक्ष्मी मेडिकल आणि दीपिका सुपर मार्केटच्या शेजारी एका लहानशा कोपऱ्यात हे पोस्ट कार्यालय आहे. जागा अपुरी, गैरसोयींनी भरलेली आणि नागरिकांना दिसणार नाही अशी आहे. आत ज्येष्ठ नागरिकांन साठी बेंच नाहीत.

पिण्या साठी पाणी नाही.याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक व महिलांना होत आहे. काळ बदलला, अनेक सुधारणा झाल्या, पण हे पोस्ट कार्यालय ‘जैसे थे’ आहे.

तरी सिडको प्रशासन, महाराष्ट्र शासन आणि भारतीय टपाल विभाग यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन, सीवूड्स सेक्टर ४६-४८ येथील हे पोस्ट कार्यालय शेजारील मोठ्या जागेत स्थलांतरित करावे किंवा आहे त्याच जागेत विस्तार करावा, अशी मागणी *महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई – नवी मुंबई विभागाचे अध्यक्ष श्री. सुरेश ईश्वर पोटे व मुंबई – नवी मुंबई संपर्क प्रमुख श्री. दिलीप गाडेकर* यांनी केली आहे.तरी संबंधित प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, ही विनंती.*सुरेश ईश्वर पोटे*अध्यक्ष, फेस्कॉम – मुंबई / नवी मुंबई प्रादेशिक विभाग*दिलीप गाडेकर*संपर्क प्रमुख, फेस्कॉम – मुंबई / नवी मुंबई

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’समागमाच्या पार्श्वभूमीवर कोंकण विभागातील 2 हजार 998 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग**विशेष ग्रामसभा, स्वच्छता मोहीम, जनजागृती आणि डिजिटल प्रचार-प्रसार उपक्रमांना वेग*

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात अजित अनंतराव पवार जयंतीनिमित्त अभिवादन

मेक फॉर वर्ल्ड’ कडे महाराष्ट्राची झेप ‘आयडिया एक्स्पो २०२६’ प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न नागापूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन; प्रक्षेत्र भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन

माणगाव येथील- रेड्डीज हॉटेल ते ढालघर फाटा, निजामपूर नाका ते कालवा रोड, मोर्बा नाका ते पवार वाडा हॉटेल तसेच इंदापूर येथील- माहि हॉटेल ते कशेने बायपास या मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन लागू करण्यात आला आहे.

vishwatmaklokswamivarta