vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा

– पालकमंत्री शंभूराज देसाई

 

सातारा प्रतिनिधी: कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल 24 डिसेंबर 2026 ते 2 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. विविध विभागांनी त्यांच्याकडील लागणाऱ्या परवानग्या वेळेत देऊन सर्व विभागांनी सन्मवयातून हा फेस्टीव्हल यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल कालावधीत महाबळेश्वर, तापोळा यासह अन्य ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, फेस्टीव्हलसाठी चांगला आराखडा तयार करा. यामध्ये स्थानिकांनाही रोजगार निर्माण व्हावेत. फेस्टीव्हलची राज्यासह पर राज्यात प्रसिद्धी करावी. यासाठी टूर कंपन्यांशी संपर्क साधावा. बाहेरील देशातील पर्यटकही या फेस्टीव्हला येतील ते ही पहावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

लोकनेते बाळासाहेब पाटील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला गती द्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे. या कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.या रुग्णालयासाठी अतिरिक्त जमिन लागणार आहे. भूसंपदानसाठी आरोग्य मंत्री यांनी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले आहे. तरी जमिन मालकाशी वाटाघाटी करुन जमिन ताब्यात घ्यावी.जीवा महाले स्मारकाला निधी कमी पडू देणार नाहीजीवा महाले यांचे स्मारक किल्ले प्रतापगड परिसरातच उभारले जाईल. यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

या स्मारकासाठी समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये प्रांताधिकारी वाई यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रांताधिकारी वाई यांनी स्मारकासंदर्भात वेळोवेळी आढावा घ्यावा.

समिती सदस्यांनी सांस्कृतिक विभागाडील जीवा महाले यांचे विविध छायाचित्र पाहून एक अंतिम करावे. अंतिम केलेल्या छायाचित्रानुसार पूर्णाकृती पुतळा मंजुरी घेऊन अनुभवी शिल्पकाराकडून पुतळा तयार करुन उभारण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले

संबंधित पोस्ट

औद्योगिक वसाहतीतील समस्यांबाबत तात्काळ उपाययोजना करण्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचे निर्देश

रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र” 2026 अतंर्गत आयोजीत रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जालना येथे 29 सप्टेंबरला रोजगार महाकुंभ; युवकांना रोजगाराच्या संधी…

vishwatmaklokswamivarta

पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*

राज्यामध्ये वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय,राज्यभरात ६० ट्रॅफिक गार्डन्स उभारण्याचा प्रस्ताव-माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

vishwatmaklokswamivarta

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ