vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, प्रतिनिधी: बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) अधिनियमांतर्गत पीडित बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्त करण्यात येणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

            सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील पदव्युत्तर पदवीधारक व्यक्ती या पदासाठी पात्र आहेत. तसेच बालशिक्षण व विकास किंवा बालसंरक्षण क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर आणि ‘एमएस-सीआयटी’ अथवा संगणक ज्ञानाचे अन्य प्रमाणपत्र असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. बालहक्क किंवा बालसंरक्षण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत संस्था, तसेच बालगृह अथवा निवारा गृहातील बालकांच्या देखरेखीशी संबंधित अधिकारीही ‘सपोर्ट पर्सन’ म्हणून पात्र ठरू शकतात.

     पात्र उमेदवारांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा टप्पा, पहिला मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे अर्ज सादर करावा. अर्ज अथवा अधिक माहितीसाठी wcd_mumupanagar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.    निवड झालेल्या ‘सपोर्ट पर्सन’ची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात येईल. त्यांना सोपविण्यात आलेली प्रकरणे, प्रत्यक्ष कामाचे दिवस तसेच रुग्णालय, बाल कल्याण समिती, पोलीस ठाणे, बालसंगोपन संस्था, पीडित बालकाचे कुटुंब, शैक्षणिक संस्था, न्यायालय, शासकीय विभाग आणि बँक आदी ठिकाणी दिलेल्या प्रत्यक्ष भेटींच्या प्रमाणात मानधन देण्यात येईल.

०००

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजय मिसाळ 

मुंबईतील वांद्रे येथील डिजिटल जाहिरात फलकांची चौकशी करावी-विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

वाशी येथे जुने सुस्थितीतील कपडे संकलन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद 813.3 किलो कपड्यांना मिळाले नवजीवन..

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न

शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी एकात्मिक शेती पद्धत आवश्यक – केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी संवाद कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

कोकणा सह  मध्य महाराष्ट्रात मुंबई उपनगरात आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. या काळात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज..

vishwatmaklokswamivarta