vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरप्रदेशस्थानिक बातम्या

पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ अर्ज माघारीनंतर आता ४१ उमेदवार रिंगणात

पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ अर्ज माघारीनंतर आता ४१ उमेदवार रिंगणात

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ०५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६ ची प्रक्रिया सुरु आहे. आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाअखेर एकूण १३ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ४१ उमेदवार आहेत,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 पदवीधर मतदार संघ निवडणूकीसंदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. पत्रकार परिषदेस विभागीय आयुक्त जी.श्रीकांत यांनी संबोधित केले. सह आयुक्त श्रीमती मंजूषा मिसकर यावेळी उपस्थित होत्या.

 पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली की, यानिवडणूकीसाठी ०५ औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी दि.२९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर या कालावधीत ६२ उमेदवारांनी ९२ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. दि.७ रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेअंती ८ उमेदवारांचे नामनिर्देश अवैध घोषीत करण्यात आले. एकूण ५४ उमेदवारांचे नामनिरेशन पत्र वैध घोषीत करण्यात आले.दि.८ रोजी एका तर दि.९ रोजी १२ अशा एकूण १३ जणांनी आपले नामनिर्देशन मागे घेऊन आपली उमेदवारी माघारी घेतली. आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या ४१ आहे.

 या निवडणूकीसाठी एकूण ३ लाख २६ हजार ७०१ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात ७७ हजार ७१७ महिला, २ लाख ४८ हजार ९७१ पुरुष आणि १३ इतर असे मतदार आहेत.एकूण ८४२ मतदान केंद्र असून ९३५ केंद्राध्यक्ष व २८१४ मतदान अधिकारी आहेत. मतदान दि.२३ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ यावेळात होणार असून मतमोजणी दि.२७ रोजी वुडस्टर्म डेकार एमआयडीसी चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. मतमोजणीसाठी ४४५५ अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्याट आले असून निरीक्षक म्हणून श्रीमती माधवी खोडे- चावरे यांची नियुक्ती आहे. तर रामेश्वर रोडगे हे संपर्क अधिकारी आहेत. त्यांचा संपर्क क्रमांक ९८२२३६६५१९ असा आहे. या निवडणूकीतील मतदान हे मतपत्रिकेद्वारे व पसंतीक्रमानुसार अस्ते. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मदत कक्ष तयार करण्यात आला असून त्याचा क्रमांक ०२४०-२३४३१६४ असा आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

०००००

संबंधित पोस्ट

ठाणे व पालघर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पालकांसाठी आनंदाची बातमी शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

आज 🌧️ रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यांतील शाळांना 2 जुलै  सुट्टी जाहीर केली

आश्रमशाळा व निवासी संस्थांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी देखरेखीवर भर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडून बालसुरक्षेचा आढावा

पवित्र पोर्टल शिक्षक पदभरती : १० हजार ३२८ पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस मुलाखत व अध्यापन कौशल्य प्रक्रिया ३ ते २५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणार

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध — अफवांवर विश्वास ठेवू नका!

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मंत्री जयकुमार रावल जिल्ह्यातील चारही तालुके दुष्काळी परिस्थितीच्या ‘प्रथम कळ’मध्ये

vishwatmaklokswamivarta