vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ विविध दाखल्यांचे वितरण नवीन मतदार नोंदणी व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर

जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ विविध दाखल्यांचे वितरणनवीन मतदार नोंदणी व शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर

मुंबई, प्रतिनिधी: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी/नॉर्थ विभागात ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत महसुली दाखले वितरण व नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन १२ ऑक्टोबर रोजी दादर (पश्चिम) येथील किर्ती एम. डूंगरसी महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या शिबिरात विविध प्रकारच्या एकूण ३७ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देऊन नवीन मतदार नोंदणीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’चा उद्देश शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट आणि पारदर्शकपणे पोहोचविणे हा आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात आयोजित या शिबिरात नागरिकांना विविध महसुली दाखले व प्रमाणपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.शिबिरात अधिवास प्रमाणपत्रे ५, उत्पन्न दाखले १०, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे ५ आणि नॉन-क्रिमीलेअर दाखले ५, अशा एकूण २५ दाखल्यांचे वितरण करण्यात आले. याशिवाय इतर प्रकारच्या १२ दाखल्यांचेही वितरण करण्यात आले. ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया तसेच आवश्यक प्रमाणपत्रांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाविद्यालयातील तरुणांसाठी नवीन मतदार नोंदणी स्टॉल, तसेच निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची माहिती देणारा स्टॉल उभारण्यात आला होता. अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले आणि विविध शासकीय योजनांच्या लाभांविषयीही नागरिक व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी बाळासाहेब तिडके, किर्ती महाविद्यालयाचे उपप्राचार्य महाजन, तहसीलदार संकेत यमगर आणि नायब तहसीलदार प्रभाकर नाईक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

शासकीय सेवा व योजनांचा लाभ नागरिकांनी अधिकाधिक घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बंद बसफेरी पूर्ववत-जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर–मार्गे शिर्डीपर्यंत विस्तार—भाविक,रुग्णांसह ग्रामीण प्रवाशांना दिलासा-उपतालुका प्रमुख अर्जुन ठोंबरे-पाटील यांच्या ठाम भूमिकेने बससेवेला मिळाली नवी दिशा!

vishwatmaklokswamivarta

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार

ठाण्यातील म्हाडाच्या चितळसर – मानपाडा येथील घरांच्या किमती होणार कमी २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसार म्हाडाच्या घरांच्या किमती कमी करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..