vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन

नागपूर, प्रतिनिधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नवरात्र उत्सवानिमित्त कोराडी येथील मंदिरात जाऊन श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज आहे. शेतकऱ्यांनाही या संकटाचा सामना करण्याची शक्ती मिळो, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवीकडे घातले.मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. मंदिर व्यवस्थापनातर्फे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, आ. परिणय फुके, आ. डॉ. राजीव पोतदार आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कोराडी येथे दरवर्षी नवरात्र उत्सव उत्साहात साजरा केला जातो. या काळात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची येथे मोठी गर्दी असते. मंदिर समितीतर्फे भाविकांना यंदाही येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय संस्कृत स्पर्धेत प्रणवी भिसेचा प्रथम क्रमांक.

vishwatmaklokswamivarta

कोकण किनारपट्टी सह मुंबई  पश्चिम उपनगरामध्ये तुफान मुसळधार पाऊस पडत अनेक ठिकाणी वाहतुकीची समस्या पाणी तुंबण्याची घटना समोर येत आहे

जातपडताळणी समित्यांच्या अस्तित्वावरून विखे पाटील लक्ष्यावर..ना. राधाकृष्ण विखेपाटील यांचा जात पडताळणी समित्या संदर्भातील सल्ला हा असंविधानिक व बेकायदेशीर असून ते सकल मराठा समाजाची परत परत फसवणूक करत असल्याचा डॉ. संजय लाखेपाटील यांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

अमृतपेठ-थेट स्वदेशी बाजारपेठ अभिनव संकल्पनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे खोपोली येथे आयोजन

अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांची कुडाळ तालुक्यातील विविध कार्यालयांना भेट महसूल कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा

खेळाडूंच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पाठीशी राहणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार खो-खो असोसिएशनची बैठक संपन्न; कामकाज होणार पेपरलेस; २३ जिल्ह्यांच्या सचिवांना लॅपटॉप