vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्तीभूमीचा विचार प्रेरणादायी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुक्तीभूमीवर नतमस्तक होत केले अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्तीभूमीचा विचार प्रेरणादायी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट-मुक्तीभूमीवर नतमस्तक होत केले अभिवादन

नाशिक, प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ९१ वर्षांपूर्वी येवला येथील मुक्तीभूमीतून केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा प्रभाव पुढे नागपूरच्या दीक्षाभूमीवरही जगाने अनुभवला. बाबासाहेबांनी आपल्याला गुलामीतून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, या भावनेतून मुक्तीभूमीवर नतमस्तक होण्यासाठी नागरिक येतात. बाबासाहेबांच्या विचारांनी वंचित आणि शोषित समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा दिली असून, या ऐतिहासिक भूमीचे महत्त्व नेहमीच अबादीत राहील. असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराच्या ऐतिहासिक घोषणेच्या ९१ व्या वर्धापनदिनानिमित्त येवला येथील मुक्तीभूमीवर आयोजित अभिवादन सोहळ्यास मंत्री श्री. शिरसाट यांनी भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. स्तुपाला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार किशोर दराडे, माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

बाबासाहेबांच्या घोषणेमुळे येवल्याच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व मिळाले असून समाजबांधवांसाठी ही पवित्र भूमी झाल्याने आज लाखो अनुयायी या भूमीत नतमस्तक होत असल्याची भावना मंत्री श्री. शिरसाठ यांनी व्यक्त केली.

मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून ३५ कोटी रुपये निधीतून विकास करण्यात आला आहे. सदर इमारत बार्टीकडे वर्ग देखील करण्यात आली असून लवकरच येथील पाली भाषा केंद्र, भिक्खू निवास यासह सर्व केंद्र सुरू करण्याबाबत लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी सरकार घेत आहे.पीक विमा कंपन्यांच्या कारभाराबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विमा कंपन्यांनी नियमांनुसार कार्यवाही करावी आणि पात्र शेतकऱ्यांना मदतीपासून दूर ठेवू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

००००

संबंधित पोस्ट

पनवेलमध्ये ‘अमृत पेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार*

मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार

vishwatmaklokswamivarta

पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; नागरिकांनी संयम पाळून अफवांपासून दूर राहावे : कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात बुलढाण्याची उल्लेखनीय झेप; राज्यात अव्वल पाचमध्ये

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन राज ठाकरे काय म्हणाले ते पहा सोशल मीडिया अकाउंट एक्स वरील संबोधन